Saturday, May 2, 2026
Homeनागपूरवाघाच्या डरकाळीने गुराख्याचा घेतला जीव..

वाघाच्या डरकाळीने गुराख्याचा घेतला जीव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-वाघाच्या डरकाळीमुळे घाबरलेल्या बकऱ्यांपैकी एक तलावात शिरली.बकरी तलावात शिरताच बकरीला वाचविण्यासाठी गुराखीदेखील तलावात उतरला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना देवलापार,ता.रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुकनापूर शिवारात सोमवारी सायंकाळी घडली.
श्रीराम बावणे वय ६० वर्षे,रा.मुकनापूर,ता.रामटेक जि.नागपूर असे मृताचे नाव आहे.श्रीराम हा सोमवारी  गावाच्या शिवारातील तलावाच्या परिसरात नेहमीप्रमाणे बकऱ्या चारायला गेला होता. त्याच्यासोबत अन्य दोघेही बकऱ्या घेऊन गेले होते. सायंकाळी अचानक वाघाची डरकाळी ऐकायला आल्याने कळपातील बकऱ्या घाबरल्या आणि सैरावैरा पळत सुटल्या.एक बकरी मागे राहिल्याने श्रीराम तिला आणायला गेले.ती तलावात शिरताच तिला काढण्यासाठी ते तलावात उतरले आणि बुडाले.ते बुडत असल्याचे दिसताच दोघांनी आरडाओरड केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने त्यांचा तलावात शोध घेतला. अंधारामुळे थांबविलेली शोधमोहीम काल,मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू करण्यात आली.सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले.याप्रकरणी देवलापार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!