गडचिरोली :-गुरे चराईसाठी जंगल परिसरात गेलेल्या गुराख्यावर वाघाने मागून हल्ला चढविल्याची घटना गडचिरोली तालुक्याच्या बोदली जंगल परिसरात शनिवारी १९ ऑक्टोंबर च्या दुपारी घडली.गुराख्याने प्रसंगावधान साधल्याने जीव वाचला पण हल्ल्यात पाठीवर व मांडीवर वाघाच्या पंज्याचे ओरखडे पडले.यादव जराते वय ६० वर्षे,रा.बोदली असे वाघाच्या हल्ल्यात जखमी गुराख्याचे नाव आहे.नेहमीप्रमाणे जराते हे शनिवारी एका सहकाऱ्यासोबत बोदली गावापासून दोन किमी अंतरावरील जंगलातील कंपार्टमेंट नंबर- १७९ मध्ये गुरे चराईसाठी गेले होते. स्वतः एका टोकाला तर दुसरा साथीदार दुसऱ्या टोकाला राहून ते गुरे चारत असतांनाच दुपारी १:३० च्या सुमारास वाघाने यादव जराते यांच्यावर मागील बाजूने हल्ला केला.या हल्ल्यात यादव यांच्या पाठीवर व मांडीवर वाघाच्या पंज्याचे ओरखडे पडले.सुदैवाने वाघाला यादव यांची मान सापडली नाही.त्यामुळे ते थोडक्यात बचावले; पण वाघ गुरगुरतच असल्याचे जराते यांनी कळविले. त्याने यादव यांच्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्या हातात लांब दांड्याची कुऱ्हाड व एक काठी होती.हेच साहित्य त्यांच्या रक्षणासाठी कामी आले.यादव यांनी जोरजोरात आवाज करून कुऱ्हाडीने वाघाचा हल्ला परतावून लावला.तोपर्यंत दुसरा सहकारी गुराखी तेथे पोहोचल्याने वाघाने तेथून काढता पाय घेतला.
वाघाचा गुराख्यावर मागून हल्ला; जीव वाचला पण.. -गडचिरोली तालुक्यातील घटना..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

