Saturday, August 29, 2026
Homeनागपूरवाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून धावत असतांनाच सात वर्षीय चिमुकला बंधाऱ्यातील पाण्यात पडल्याने त्याला वाचविण्यासाठी उडी घेतलेल्या बापाचा व तत्पूर्वीच लेकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रामटेक तालुक्याच्या देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छवारी गावच्या शिवारात घडली.जीवन धर्मदास कोकोडे वय ३६ वर्षे व जतिन जीवन कोकोडे वय ७ वर्षे,रा.छवारी,ता.रामटेक,जि.नागपूर असे मृतक बाप-लेकाचे नाव आहे.
  • अशी घडली घटना👇
काल रविवारी जीवन कोकोडे,मुलगा जतिन व जीवन कोकोडे यांचा सालई गावातील २८ वर्षीय साळा संजय उईके हे तिघेही छवारी गाव शिवारातील लखन बंधाऱ्याजवळील शेतावर गेले होते.तिघेही शेतात काम करत असतांना साळा संजय उईके याला काही अंतरावर पट्टेदार वाघ दिसला.वाघ दिसताच संजयची भंबेरी उडाली.दरम्यान,त्याने वाघ म्हणून ओरड करताच तिघेही जिवाच्या आकांताने वेगवेगळ्या दिशेने धावत पळत सुटले.साळा बंधाऱ्याच्या खालच्या बाजूने पळाला,तर बापलेक बंधाऱ्याच्या वरच्या दिशेने धावू लागले.धावत असतांनाच अचानक चिमुकल्याचा पाय घसरला आणि तो बंधाऱ्याच्या खोल पाण्यात पडला.मुलाला वाचवण्यासाठी जीवन कोकोडे यांनी पटकन पाण्यात उडी घेतली.मुलाला वाचवण्याच्या धावपळीत आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बंधाऱ्याच्या खोल पाण्यात बुडाले.यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नारायण तुरकुंडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव टुले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत बचाव व पंचनामा प्रक्रिया पूर्ण केली.घटनेचे गांभीर्य आणि वाघाच्या पायांचे ठसे लक्षात घेता वनविभागाने मृतकांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली असून तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये सुपूर्द केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!