Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीवसतिगृहाचा सज्जा कोसळल्याने युवा मजुराचा मृत्यू..

वसतिगृहाचा सज्जा कोसळल्याने युवा मजुराचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अहेरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मुलचेरा येथे बांधण्यात येत असलेल्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहाचा सज्जा कोसळल्याने युवा मजुराचा मृत्यू झाला.गितेश ललीत मिस्त्री वय.१९रा.गुंडापल्ली असे मृत मजुराचे नाव आहे.सदरची घटना आज,गुरुवारी ५ सप्टेंबरला दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने २५ कोटी रुपये खर्चुन शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येत आहे.आज,गुरुवारी गितेश मिस्त्री हा इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर काम करीत होता.परंतु अचानक सज्जा कोसळल्याने तो खाली पडला.डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.घटनेचा पुढील तपास मुलचेरा पोलिस करीत आहेत.आश्रमशाळा आणि इमारतीचे बांधकाम भंडारा येथील एका कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आल्याची माहिती आहे.इमारत निर्माणाधीन अवस्थेत असतानाच सज्जा कोसळल्याने बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आश्रमशाळा आणि वसतिगृहात शेकडो विद्यार्थी वास्तव्य करणार आहेत.अशावेळी निकृष्ट बांधकाम होऊन पुन्हा काही दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!