- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिनांक-६ सप्टेंबरला गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येणार असणार आहेत.सर्वप्रथम सकाळी ११ वाजता अहेरी येथे आगमन होणार असून सकाळी ११.१५ वाजता राजे धर्मवीर शाळा रेड्डी कॉम्पलेक्स अहेरी रोड,नागेपल्ली येथे रक्षाबंधन कार्यकमास उपस्थित राहणार आहेत.सकाळी ११.४५ वाजता सावरकर चौक आलापल्ली येथे आदिवासी बंधू-भगिनींमार्फत पारंपारिक नृत्य कार्यक्रम सादरीकरण कार्यक्रमास उपस्थिती.दुपारी १२ वाजता वन विभागाचे मैदान आलापल्ली येथे जनसन्मान यात्रा- शेतकरी व लाडक्या बहिणींशी संवाद.दुपारी २.१५ वाजता राजवाडा निवासस्थान अहेरी येथे राखीव व दुपारी ३.२० वाजता हेलिकॉप्टररने नागपूरकडे प्रयाण करतील.
- Advertisement -

