Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीवळण घेतांना कार झाडाला आदळली; तरुणाचा कारमध्येच मृत्यू.. - तीन तरुणांवर रुग्णालयात...

वळण घेतांना कार झाडाला आदळली; तरुणाचा कारमध्येच मृत्यू.. – तीन तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी वरून रात्रीच्या सुमारास चार तरुण चारचाकी वाहनाने घोट कडे जात असतांनाच घोट-आष्टी मार्गावरील ठाकुरनगरच्या पहाडीजवळ वळण असलेल्या मार्गावर कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन आदळली.यात एका तरुणाचा कारमध्येच मृत्यू झाला,तर तिघे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना काल मंगळवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अपघातात अमन मुज्जफर शेख वय २४ वर्षे रा.ता.अहेरी( हल्ली मुक्काम-घोट)असे मृतक तरुणाचे नाव आहे.तर निखील नरेश राऊत वय २३ वर्षे,सचिन शेखर अधिकारी वय ३२ वर्षे व अभय शंकर रॉय वय २२ वर्षे तिघेही रा.घोट,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली अशी जखमींची नावे असून सचिन अधिकारी याचेवर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे.तर अभय रॉय व निखील राऊत या दोघांवर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेतील चारही तरुण रात्रीच्या सुमारास एमएच ३३ ए ४१४१ या क्रमांकाच्या मारुती सुझुकी कारने आष्टी वरून घोटकडे परत येत होते.अश्यातच भरधाव वेगात असलेली कार वळण मार्गावर अनियंत्रित झाल्याने धाडकन रस्त्याच्या कडेला असलेल्या सागवनच्या झाडाला जाऊन आदळली.धडक इतकी भीषण होती की,अमन कारमध्येच मृत्यू झाला.घटनेची माहिती घोट पोलीस मदत केंद्रास होताच केंद्राचे एपीआय किशोर शिंदे,पीएसआय संजय गोंगले सह पथक घटनास्थळी दाखल होत जखमींना तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.घटनेचा पुढील तपास घोट पोलीस मदत केंद्राचे पीएसआय संजय गोंगले करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!