Tuesday, September 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; पैसे जमा होण्यास सुरुवात.. - दीड हजार की...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; पैसे जमा होण्यास सुरुवात.. – दीड हजार की तीन हजार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी असून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.काल सोमवारच्या संध्याकाळपासूनच जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.यामध्ये काही महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले आहेत.तर  काही महिलांच्या खात्यात आज, मंगळवार २४ फेब्रुवारीला पैसे जमा होणार आहेत.मात्र, ज्या महिला पात्र नाहीत त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत.त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल आणि केवायसी केली असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. यामागे काही कारणे आहेत.लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले होते. तरीही अनेक महिलांनी केवायसी केली नाही. जवळपास ८४ लाख महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. यातील काही महिलांनी केवायसी केलेली नाही.त्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.याचसोबतच ज्या महिलांनी खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांची माहिती ई-केवायसीमध्ये समोर आली आहे.त्यामुळे त्या महिलांचाही लाभ बंद करण्यात आला आहे. याचसोबत ज्या महिलांची केवायसीमध्ये चूक झाली आहे,त्यांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे.त्यांना काही दिवसांनी पैसे दिले जातील.शासनाने लाडक्या बहिणींसाठी शुक्रवार ६ फेब्रुवारीपासून पोर्टल सुरु केले आहे.या पोर्टलवरुन ई-केवायसीची दुरुस्ती ३१ मार्च २०२६ पर्यंत करता येणार आहे.या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!