- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
धाराशिव :-जिल्ह्याच्या बावी गावात आज,सोमवार १६ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले.नेहमीची दिनचर्या करणारे कुटूंब दार लावून ची-पटाक करीत नसल्याने शेजारच्यांनी आवाज देऊनही कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने काही नागरिकांनी घराच्या पत्र्याच्या फटीतून टोंगून पाहीले असता २८ वर्षीय तरुण लटकलेल्या अवस्थेत तर पत्नी आणि दोन वर्षीय चिमुकला झोपलेल्या अवस्थेत दिसून आला.लगेच नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता धाराशिव तालुक्यातील बावी येथील २८ वर्षीय तरुणाने पत्नी व दोन वर्षाच्या चिमुकल्यास विष देऊन स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले.लक्ष्मण मारुती जाधव,वय २८ वर्षे, रा.बावी,ता.जि.धाराशिव असे आत्महत्या करुन कुटुंबाला संपवलेल्या तरुणाचे नाव आहे.लक्ष्मण याचा तीन वर्षापूर्वी तेजस्वीनी हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन वर्षाचा शिवांश मुलगाही होता. लग्नानंतर लक्ष्मण जाधव हा पत्नी, मुलासमवेत राहत होता.रोज सकाळी उघडा असणारा दरवाजा सोमवारी सकाळचे दहा वाजले तरी उघडत नसल्याने परिसरातील नागरिकांनी दरवाजा ठोठावला.मात्र, आतून प्रतिसाद मिळत नव्हता.पत्र्याच्या फटीतून काही नागरिकांनी आत डोकावून पाहिल्यानंतर लक्ष्मण जाधव लटकत असलेला व त्यांची पत्नी व मुलगा झोपल्याचे दिसले.त्यानुसार पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड,ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पत्रा कट करुन आत प्रवेश केला. त्यावेळी पत्नी व मुलगा निपचित पडलेले व लक्ष्मण जाधव हा लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.लक्ष्मण जाधव याने स्वतः विष प्राशन करुन पत्नी व मुलांना दिले. त्यानंतर लक्ष्मण याने गळफास लावून आत्महत्या केली.लक्ष्मण हा ऑनलाइन जुगाराच्या आहारी गेला होता.शेअर मार्केटमध्येही त्याचे आर्थिक नुकसान झाले होते.कर्जबारीपणामुळे शेतजमीनही विकल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा होती.आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.
- Advertisement -

