Saturday, September 5, 2026
Homeनागपूरराहत्या घरी तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या..

राहत्या घरी तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- एका तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल सोमवारी कामठी (नवीन) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवनगरी येथे उघडकीस आली.पीयूषा ऊर्फ पीयू रंगलाल येलेकर वय २८ वर्षे,रा.देवनगरी,नवीन कामठी असे मृत तरुणीचे नाव आहे.पीयूशाला मिरगीचा आजार होता; असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.रविवारी तिचे आई-वडील नागपूरला नातेवाइकांकडे गेले होते.घरी कुणीही नसल्याचे पाहून पीयूशाने घरातील बेडरूममध्ये छताच्या हुकाला ओढणीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.काल सोमवारी सकाळच्या सुमारास आई-वडील घरी आले असता,ती छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.पीयूषाने नेमकी आत्महत्या कशासाठी केली; याचे कारण कळू शकले नाही.याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास ठाणेदार प्रमोद पोरे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!