Tuesday, August 18, 2026
Homeमुंबईराज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप मोठा भाऊ.. - तब्बल २१ महापालिकांमध्ये वरचढ..

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप मोठा भाऊ.. – तब्बल २१ महापालिकांमध्ये वरचढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील २९ महानगरपालिकांचे आज,शुक्रवार १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आले. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनुसार महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीत
भारतीय जनता पक्षच मोठा भाऊ ठरल्याचे दिसून येत आहे.भाजपने विरोधकांना मागे टाकत तब्बल २१ महापालिकांमध्ये आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.भाजपने केवळ जागाच जिंकल्या नाहीत,तर राज्यातील महत्त्वाची आर्थिक आणि राजकीय केंद्रे आपल्या ताब्यात ठेवली आहेत,मुंबईमध्ये शिवसेनेच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने मुंबईवर कब्जा केला आहे.तर पुणे,नागपूर आणि नाशिक या मोठ्या शहरांमधील आपली सत्ता भाजपने यशस्वीपणे कायम राखली आहे.भारतीय जनता पक्षाने मुंबई,नवी मुंबई,मीरा भाईंदर,उल्हासनगर, पनवेल,पुणे,पिंपरी चिंचवड, इचलकरंजी,सांगली,मिरज कुपवाड,कोल्हापूर,सोलापूर, नागपूर,अकोला,अमरावती,नाशिक,धुळे,जळगाव, अहिल्यानगर(अहमदनगर),जालना,नांदेड वाघाळा आणि छत्रपती संभाजीनगर इत्यादी महापालिकांमध्ये सत्ता काबीज केली आहे.अश्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली या आपल्या हक्काच्या बालेकिल्ल्यांमध्ये वर्चस्व टिकवून ठेवले आहे.या दोन महत्त्वाच्या महापालिकांवर शिवसेनेचा भगवा कायम आहे.त्यातच, काँग्रेसला केवळ ३ महानगरपालिकांमध्ये यश मिळाले आहे.यामध्ये लातूर,भिवंडी-निजामपूर व चंद्रपूर इत्यादींचा समावेश आहे.उद्धव ठाकरे यांच्या गटाला परभणीमध्ये यश मिळाले आहे,तिथे त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने सत्ता मिळवली आहे.बहुजन विकास आघाडीने आपले अस्तित्व टिकवत वसई-विरार महापालिकेवर पुन्हा एकदा पकड मजबूत केली आहे.तर मालेगाव महानगरपालिकेचा निकाल मात्र पेचात अडकला आहे.येथे कोणत्याही प्रमुख पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.त्यामुळे सत्तेच्या चाव्या आता अपक्षांच्या हाती आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना आणखी प्रत्येकी ५ लाखांचे अर्थसहाय्य मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ५...

नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल; पोलिस यंत्रणा सतर्क.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपुरातील नामांकित शाळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल आज,मंगळवार १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर दिसून येताच शिक्षण...

जिल्हाधिकारी व एसपी रात्रीच पोहचले मार्कंडा देवस्थान परिसरात; विकास व संवर्धन कामांची केली पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान परिसरात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग(एएसआय) यांच्यामार्फत सुरू असलेल्या कामांची जिल्हाधिकारी...

सट्टा-पट्टीचे आकडे घेणारा ताब्यात..!

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरीत्या सट्टा-पट्टीचे आकडे घेणाऱ्यास ताब्यात घेत त्याच्याकडून २ हजार १५० रुपयांची रोख,सट्टा-पट्टीचे आकडे लिहिलेली चिठ्ठी,बॉलपेन व रायटिंग...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!