- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक उईके यांचे आज,शुक्रवार २४ एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन होणार आहे. त्यानंतर,दुपारी बारा वाजता विविध विभागांच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील. त्यानंतर रात्री सोयीनुसार वन अकादमी येथे आगमन व राखीव आणि उद्या,शनिवार २५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता वन अकादमी येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील. दौऱ्यादरम्यान गडचिरोली येथील शासकीय आश्रमशाळांतील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासंदर्भातील उपाययोजनांवरील कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात धान खरेदीच्या अनुषंगाने आढावा बैठकही घेण्यात येणार आहे.शनिवार,२५ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता शासकीय विश्रामगृह,गडचिरोली येथे आगमन व राखीव.त्यानंतर सकाळी ९ वाजता शासकीय आश्रमशाळांतील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत आयोजित कार्यशाळेत महाराजा सेलिब्रेशन हॉल,धानोरा रोड,गडचिरोली येथे उपस्थित.दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथे धान खरेदीच्या अनुषंगाने आढावा बैठकीस उपस्थित व सायंकाळी सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.
- Advertisement -

