Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीरस्ते बांधकामाच्या प्रलंबित कामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात -...

रस्ते बांधकामाच्या प्रलंबित कामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते बांधकामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात,असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज,शुक्रवारी आढावा बैठकी  प्रसंगी दिले.यासोबतच राष्ट्रीय महामार्ग बांधकामांमध्ये येणाऱ्या अडचणींची माहिती एकत्र करून ती सोडवण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत रस्ता विषयक कामांचा आढावा घेण्यात आला.यावेळी  सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल मीना(गडचिरोली),मानसी(देसाईगंज),अमित रंजन(चामोर्शी),नमन गोयल (एटापल्ली),सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे,कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे,बळवंत रामटेके (आलापल्ली),आर.बी.कुकडे (विशेष प्रकल्प सिरोंचा),राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋशिकांत राऊत,चंद्रशेखर सालोडकर (प्रधानमंत्री ग्राम सडक योजना),जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता दोरखंडे,उपअभियंता राजेंद्र कटकमवार (विद्युत उपविभाग) सहाय्यक अधीक्षक अभियंता दिनेश पाटील,सुमित मुंदडा प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा यांनी राष्ट्रीय महामार्ग आलापल्ली ते गुंडेनुर,चामोर्शी-आलापल्ली-सिरोंचा,आरमोरी गडचिरोली,चातगावव धानोरा मार्ग,कोरची ते कुरखेडा तसेच दक्षिण गडचिरोली व उत्तर गडचिरोलीतील महामार्गाच्या बांधकामाबाबत आढावा घेतला. आरमोरी ते गडचिरोली हा राष्ट्रीय महामार्ग नव्याने बांधकामासाठी ७४६ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे संबंधितांनी सांगितल्यावर सदर काम पूर्ण होईपर्यंत सध्याच्या मार्ग दुरुस्तीसाठी तसेच पावसाळ्यात पाल नदीवर नागपूर मार्ग बंद होत असल्याने याबाबत अडचणी कशा सोडवता येतील यावर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यात विशेषता चामोर्शी व एटापल्ली तालुक्यात मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असून यामुळे राज्य महामार्ग लवकर खराब होतात.भविष्यात या मार्गावर जड वाहतूक अधिक वाढणार असल्याने या मार्गाच्या गुणवत्तेत अधिक वाढ करण्यासाठी ज्या निकषांच्या अधीन राहून हे मार्ग बांधण्यात येतात, त्यात बदल करण्याचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.जिल्ह्यात २३४ पुलांच्या निर्मितीची आवश्यकता आहे,मात्र यासाठी एकत्रितपणे मोठा निधी उपलब्ध होण्यास विलंब होऊ शकतो,त्यामुळे प्राधान्यक्रम ठरवून महत्त्वाच्या पुलांचे प्रस्ताव टप्प्याटप्प्याने सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.केंद्र शासनाच्या निधीतून सुरू असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी तसेच या आर्थिक वर्षात मंजूर प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.याबाबत एप्रिलमध्ये पुन्हा आढावा घेण्यात येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीला बांधकाम विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!