Tuesday, September 1, 2026
Homeगोंदियारंगपंचमीला गालबोट; दोघांचा तलावात बुडून मृत्यू..

रंगपंचमीला गालबोट; दोघांचा तलावात बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-रंगपंचमीचा उत्सव साजरा केल्यानंतर शरीरावरील रंग काढण्यासाठी गाव तलावात आंघोळीसाठी उतरलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार ३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या सडक-अर्जुनी तालुक्यातील डूग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फुटाळा येथे उघडकीस आली.सागर गहाणे वय १६ वर्षे व प्रणय गहाणे वय १३ वर्षे अशी तलावात बुडून मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत.
आज सकाळच्या सुमारास रंग खेळून झाल्यावर फुटाळा येथील काही मुले गाव परिसरात असलेल्या तलावात आंघोळीसाठी गेले होते.दरम्यान,सागर व प्रणय आंघोळीसाठी तलावाच्या पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला.घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली आणि डुग्गीपार पोलिसांना कळवले.घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले.घटनेचा पुढील तपास डुग्गीपार पोलिसांकडून सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!