उद्रेक न्युज वृत्त :-येत्या २३ जून पासून शाळा सुरू होणार असून राज्याच्या विविध जिल्ह्यातील ‘१०० शाळांना भेटी देणे’ या शासनाच्या उपक्रमाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींसह वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मतदारसंघातील किंवा जवळच्या एका शाळेला भेट देण्याचे सूचित करण्यात आले आहे.शाळांमधील कामकाजाचा शैक्षणिक गुणवत्तेचा तसेच इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.त्यानुसार शिक्षण विभागाने लोकप्रतिनिधींच्या भेटीची यादी तयार केली आहे तसे निमंत्रण लोकप्रतिनिधींना दिले जाणार आहे. ‘१०० शाळांना भेटी देणे’ असे उपक्रमाला नाव देण्यात आले आहे.पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधींनी मतदारसंघातील किंवा नजीकच्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत,सोयीसुविधा व गुणवत्तेचा आढावा घ्यावा,असे सूचित करण्यात आले आहे.त्यातच यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांतील पहिल्या वर्गापासून ‘सीबीएसई पॅटर्न'(केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ)चा श्रीगणेशा होणार आहे.यामुळे ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.शिक्षकांनाही ‘सीबीएसई पॅटर्न’ साठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमधेही सीबीएसई पॅटर्न राबविण्यात येणार आहे.नव्या निर्णयामुळे शैक्षणिक भेदभाव संपण्यास मोठी मदत होणार आहे.राज्य शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता पहिलीसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाचा (सीबीएसई पॅटर्न) समावेश करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमापेक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाकडे राज्यातील विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढल्याने जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होऊ लागली आहे.त्यामुळे शिक्षण विभागाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.विशेष म्हणजे,हा नवीन अभ्यासक्रम मराठी माध्यमातून शिकविला जाणार आहे.टप्प्याटप्प्याने हा अभ्यासक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.यावर्षी सुरुवातीला या अभ्यासक्रमाचा समावेश इयत्ता पहिलीसाठी सुरू करण्यात येणार आहे.
येत्या २३ जून पासून वाजणार शाळेची घंटा; यंदा पहिल्या वर्गापासून ‘सीबीएसई पॅटर्न’ चा होणार श्रीगणेशा..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

