Monday, August 24, 2026
Homeब्रम्हपुरीयेत्या रविवारी ब्रम्हपुरीत राज्यस्तरीय 'पावसाच्या कविता' कविसंमेलनाचे आयोजन.. - राज्याच्या कानाकोपऱ्यातून कवींनी...

येत्या रविवारी ब्रम्हपुरीत राज्यस्तरीय ‘पावसाच्या कविता’ कविसंमेलनाचे आयोजन.. – राज्याच्या कानाकोपऱ्यातून कवींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-आविष्कार साहित्य मंच ब्रम्हपुरी
आणि मराठी वाङ्ममय मंडळ व संशोधन केंद्र नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय ‘पावसाच्या कविता’ कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.सदरचे कविसंमेलन येत्या,रविवार २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या स्व.हिरालालजी भैय्या सभागृहात होणार आहे.या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक तथा ने.हि.शिक्षण संस्था ब्रम्हपुरीचे सचिव अशोक भैय्या यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर असणार आहेत. कविसंमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक तथा मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.धनराज खानोरकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे,तर महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.नोमेश मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या कविसंमेलनामध्ये निमंत्रित प्रवीण आडेकर (भद्रावती),रमेश बुरबुरे (वडसा),संजय गोडघाटे (नागपूर),सुरेश डांगे(चिमूर),गीता रायपुरे(चंद्रपूर), प्रीती जगझाप (बल्लारपूर),नूरजहा पठाण (गोंदिया), माणिक खोब्रागडे (नागपूर) आणि विनोद गहाणे (अर्जुनी) यांसारखे अनेक नामवंत कवी आपल्या रचना सादर करतील.या कविसंमेलनात एक ‘खुले कविसंमेलन’ देखील आयोजित करण्यात आले आहे. ज्यात राज्यातील नवोदित तसेच अनुभवी कवींना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळेल.या आयोजनासाठी आविष्कार मंचचे अध्यक्ष मंगेश जनबंधू (७७७४९७९८१८) आणि सचिव गौतम राऊत (८५५१८८६००९) यांच्याशी नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा,तसेच मंजुषा सावरकर (९४०३१९४१३०) यांच्याशीही संपर्क साधता येईल. आयोजकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कवींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या साहित्य सोहळ्याचा भाग व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित बोरकर करणार असून, गौतम राऊत आभार प्रदर्शन करतील.आविष्कार साहित्य मंचचे सर्व पदाधिकारी,ज्यात मंगेश जनबंधू,गौतम राऊत,मंजुषा सावरकर,भिमानंद मेश्राम,भाविक सुखदेवे,ललित बोरकर,छाया जांभुळे,वर्षा चौधरी,डॉ. धनराज खानोरकर,ज्योती नवघरे,शशी मदतकर,इंदु मुळे,सोनाली सहारे,देवेंद्र निकुरे,चैतन्य मातुरकर, कल्पना सूर्यवंशी,मंगेश गोवर्धन,अशोक शामकुळे, हिराकांत निहटे यांचा या आयोजनात सक्रिय सहभाग असून राज्यातील समस्त काव्यप्रेमींनी या साहित्य सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नैनपूरच्या विद्यार्थ्यांचा ‘सीमेवरील जवानांसाठी प्रेमाची राखी’ उपक्रम; जवानांना पाठवल्या राख्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा,सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना...

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!