Sunday, August 16, 2026
Homeगडचिरोलीयेत्या रविवारला गडचिरोली येथे 'जत्रा घडली नागोबाची' महानाट्याचे प्रकाशन..तथा - नाट्यश्री उत्कृष्ट...

येत्या रविवारला गडचिरोली येथे ‘जत्रा घडली नागोबाची’ महानाट्याचे प्रकाशन..तथा – नाट्यश्री उत्कृष्ट कवी पुरस्कार वितरणासह कवी संमेलनाचे आयोजन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री’ च्या वतीने झाडीपट्टीतील नाटककार “चुडाराम बल्हारपुरे” लिखीत व मधुश्री प्रकाशन पुणे प्रकाशित “जत्रा घडली नागोबाची” या महानाट्याच्या पुस्तकाचे प्रकाशन व लोकार्पण येत्या रविवारी १८ मे रोजी नागपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ रंगकर्मी व समिक्षक डॉ.बळवंत भोयर यांचे हस्ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक,गडचिरोली येथील सभागृहात संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक व ज्येष्ठ रंगकर्मी प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर हे राहणार असून प्रसिद्ध साहित्यिक व संशोधक पांडुरंग सोनवणे पोलिस उप अधीक्षक नागपूर हे प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावणार आहेत.तर प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम सिंदेवाही हे नाट्य समीक्षण करणार आहेत.
या प्रसंगी जत्रा घडली नागोबाची महानाट्यातील ज्येष्ठ कलावंत दादा सुंदरकर,जयदेव सोमनाथे,गुलाम कुरेशी,प्रकाश गाठे,प्रा.यादव गहाणे,वासुकुमार मेश्राम व इतर कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
नाट्यश्रीचे कलावंत व संगीतकार प्रकाश गाठे,विठ्ठल खानोरकर,दिवाकर बारसागडे,विजया पोगडे,केवल बगमारे हे महामृत्युंजय मार्कंडेश्वर या नाटकातील नांदी,स्वागतगीत व “जत्रा घडली नागोबाची ” या नाटकातील नाट्यगीते सादर करणार आहेत.
या निमित्ताने नाट्यश्रीने सन-२०२४ मध्ये वर्षभर घेतलेल्या नाट्यश्री उत्कृष्ट कवी व कविता या उपक्रमांतर्गत ५० सत्रातील ६० पुरस्कृत कवींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच राज्यस्तरीय कवींचे कविसंमेलनही घेण्यात येणार असून मुंबई,कोल्हापूर,नाशिक,लोणार सरोवर,अमरावती, चंद्रपूर,भंडारा,गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील ७० कवींनी सहभाग नोंदविला आहे.
येत्या १८ मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमास जास्तीत जास्त कवी,साहित्यिक व रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्यश्रीचे दादा सुंदरकर,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे,योगेश गोहणे,प्रा.अरुण बुरे,मारोती लाकडे,निरंजन भरडकर,प्रभाकर गडपायले, राजेंद्र जरुरकर,गुणवंत शेंडे व सौ.कुंदा बल्हारपूरे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केवळ इमारती,दुरुस्ती आणि भौतिक सुविधा निर्माण करणे अंतिम उद्दिष्ट नसून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे-शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर – ‘आदर्श’ व ‘पीएम श्री’...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र व राज्य शासनाकडून शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा वेळेत व उद्देशानुरूप विनियोग झाला...

आदर्श शाळांची संख्या वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर-राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकेकाळी मागास आणि नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गडचिरोलीची ओळख आता वेगाने बदलत असून संपूर्ण देशाचे लक्ष या जिल्ह्याकडे वेधले जात...

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!