Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीयेत्या गुरुवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर गडचिरोलीत.. - महिलांनी तक्रारी...

येत्या गुरुवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर गडचिरोलीत.. – महिलांनी तक्रारी मांडण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पुढील महिन्याच्या येत्या,गुरुवार ६ नोव्हेंबर २०२५ रोजी जनसुनावणी होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत.गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नियोजन भवन येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या जनसुनावणीस महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात,असे आवाहन चाकणकर यांनी केले आहे.
महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ६ नोव्हेंबर २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्यात असणार आहेत.यावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासन,पोलीस,कामगार,परिवहन, आरोग्य,शिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेतली जाणार आहे.
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे.राज्याच्या काना कोपऱ्यातील
महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे,आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही.त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे.महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस,प्रशासन, विधी सल्लागार,समुपदेशक,जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते.यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे,असे त्यांनी सांगितले.
महिला आयोग दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज,बुधवार २९ ऑक्टोंबरला
संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला.जिल्ह्यातील महिलांशी संबंधित प्रलंबित तक्रारी व प्रकरणे तातडीने निकाली काढून तक्रार निवारणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले.सर्व विभागांनी समन्वय साधून महिलांच्या न्यायनिवाड्यासाठी प्रभावी आणि संवेदनशील पद्धतीने कार्यवाही करावी,असेही त्यांनी नमूद केले.बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे तसेच इतर संबंधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!