Tuesday, August 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयुद्धजन्य परिस्थितीत फेक न्युजने सरकारची वाढली डोकेदुखी..! - सोशल मीडियावरही अफवांचा भडिमार..

युद्धजन्य परिस्थितीत फेक न्युजने सरकारची वाढली डोकेदुखी..! – सोशल मीडियावरही अफवांचा भडिमार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-युद्धजन्य परिस्थितीत विविध माध्यमांद्वारे फेक न्युज म्हणजेच ज्यात काही तथ्य नाही व कसलाही संबंध नसतांनाही हातचे बनाव करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून भीतीचे वातावरण पसरवले जात आहे.भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता, गेल्या दोन दिवसांपासून फेक न्युजने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.अशातच महाराष्ट्र सायबर सेलने काल,शुक्रवारी ५ हजार ३०० फेक न्यूजचा शोध घेतला व ते हटविण्यात आले.त्यातच सर्वात सर्वाधिक अफवा सोशल मीडियावरून पसरविल्या जात आहेत.
आर्मेनिया अजरबैजान युद्धाचे फोटो व्हिडीओ शेअर करत ते भारत-पाकिस्तान युद्धाचे दाखविण्यात येत
आहेत.अशा अनेक फेक गोष्टी जनमानसात व्हायरल करण्याचा प्रयत्न शत्रूच्या गोटातून केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अश्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रत्येक जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.पसरविण्यात येणाऱ्या अफवांमुळे मुंबईत भीतीचे वातावरण असून, सुट्टीच्या हंगामात नियोजन नसतांना अनेक कुटुंबे आपापल्या गावी निघाल्याचे चित्र आहे.महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुख यशस्वी यादव यांच्या माहितीनुसार,२३ एप्रिलपासून जवळपास दहा लाख सायबर हल्ल्यांची देशभरात नोंद झाली आहे.हे हल्ले रोखण्यास सायबर विभागाला यश आले आहे.यामागे एक मोठा गट काम करत असल्याचा संशय आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!