Tuesday, August 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तव्हायरल व्हिडिओ; भारताचा पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक' चा प्रहार...

व्हायरल व्हिडिओ; भारताचा पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक’ चा प्रहार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पाकिस्तान सुधरण्याचे नाव घेत नसल्याने भारताकडून दे धक्के सुरू आहेत.अश्यात आता भारताने चिनाब नदीवर बांधलेल्या रियासी येथील सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडले.या धरणातून आतापर्यंत पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्यात आले होते.सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले होते.आता पुन्हा सलाल धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.भारताने सलाल आणि बगलिहार धरणातून पाणी सोडल्याने पाकिस्तानात महापूराचे संकट निर्माण झाले आहे.जोरदार पावसामुळे भारताने रामवन येथील बगलिहार धरणाचा एक दरवाजा उघडला आहे.भारताने स्पष्ट केले की सिंधू जल करार स्थगित झालेला आहे.त्यामुळे आता या धरणांमधून किती पाणी सोडायचे हा निर्णय भारताच्या हातात आहे.भारतानं यापूर्वी चिनाब नदीतील पाणी रोखले होते.आता दरवाजा उघडल्याने पाणी पाकिस्तानात पोहोचेल.पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला करून निष्पाप पर्यटकांचे बळी घेतले होते. त्याला सडेतोड प्रत्युत्तर देत भारत सरकारने सिंधू जल करार स्थगित केला होता आणि सिंधू नदीचे पाणी रोखले होते.यानंतर पाकिस्तानने थयथयाट करत भारताने आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन केले असल्याचा कांगावा केला होता; पण त्याला भारत सरकारने केराची टोपली दाखवली होती आणि दहशतवादाची कदापि गय केली जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते.पाणी सोडताच नदी परिसरात वाळू उपश्यासाठी ठेवण्यात आलेले साहित्य वाहून जातांनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओ👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!