Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तयुद्ध बंदीची सहमती अन् अवघ्या काही तासातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन..

युद्ध बंदीची सहमती अन् अवघ्या काही तासातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काही तासांपूर्वीच पाकिस्तानने माघार घेत युद्ध बंदिस सहमती दर्शवली होती.पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी भारतासोबत शस्त्रसंधी झाल्याचे सांगितले होते.आज,शनिवार १० मे रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधी झालेली होती.भारत आणि पाकिस्तानचे लष्करी अधिकारी येत्या,सोमवारी १२ मे रोजी बैठक घेणार आहेत.दोन्ही देशांनी थेट चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे भारताकडून सांगण्यात आले.पाकिस्तानच्या विनंतीवरुन सैनिकी कारवाई थांबवल्याचे भारत सरकारकडून सांगण्यात आले.यासंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्रालय सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती दिली की, पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी आज दुपारी ३:३५ वाजता भारतीय लष्कराच्या महासंचालकांना फोन केला.दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५ वाजल्यापासून जमिनीवर,हवेत आणि समुद्रात सुरु असलेला गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपासून सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या. लष्कराचे ऑपरेशन्स महासंचालक १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करणार होते.अशातच आता अवघ्या तीन तासातच पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. ‘हम नहीं सुधरेंगे’ हे पुन्हा दाखवत रात्री ८ वाजता जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने पु्न्हा एकदा गोळीबार सुरु केला आहे.पाकिस्तानकडून ड्रोन हल्लेदेखील केले जात आहेत.श्रीनगरमध्ये स्फोटांचे ४ ते ५ आवाज ऐकू येऊ लागले.सांभा सेक्टरमध्ये सायरन वाजू लागले आहेत.पाकिस्तानी हल्ल्यांना जशास तसे उत्तर देण्याच्या सूचना सीमा सुरक्षा दलाला देण्यात आलेल्या आहेत.जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात गोळीबार सुरु झाला आहे.शस्त्रसंधीची घोषणा होऊन अवघे तीन तास उलटले आणि पाकिस्तानने पु्न्हा एकदा आगळीक केली आहे.काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात संशयास्पद ड्रोनचा स्फोट झाला.अखनूर,राजोरी, आरएसपुरा आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने उखळी तोफांचा वापर सुरु केला आहे.बारामुलामध्ये ड्रोन हल्ला झालेला आहे.पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्याचे आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले आहेत. पाकिस्तानने गोळीबार सुरु केल्यानंतर जम्मूतील बहुतांश भागात ब्लॅकआऊट करण्यात आलेला आहे. बारामुलामधील वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे.श्रीनगरमधील अनेक भागांमध्येही अंधार पसरला आहे.राजस्थानच्या राजोरीमध्येही गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.पाकिस्तानचे ड्रोन्स पाडण्याचे काम हवाई सुरक्षा यंत्रणेकडून केले जात आहे.भारताची एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणा सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडत आहे.पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला. शस्त्रसंधीचे काय झाले,असा सवाल त्यांनी केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!