Friday, September 4, 2026
Homeमुंबईयाला म्हणतात आमदार; प्रत्यक्षात कृती..

याला म्हणतात आमदार; प्रत्यक्षात कृती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदाचे आमदार विक्रम पाचपुते हे असली पनीर आणि नकली पनीर घेऊनच काल बुधवारी विधानसभेत गेले आणि दूधच नसलेल्या,व्हेजिटेबल फॅटचा वापर करून बनविल्या जाणाऱ्या नकली पनीरवर बंदी आणणार का? त्यांच्या उत्पादकांना तुरुंगात टाकणार का? असा प्रश्न त्यांनी सरकारला केला.त्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
लक्षवेधी सूचना मांडताना एका हातात नकली तर दुसऱ्या हातात असली पनीर पाचपुते यांनी सभागृहात उंचावून दाखविले आणि ते अध्यक्षांकडे पाठविले. पाचपुते म्हणाले की,ॲनालॉग चीज हा पदार्थ राज्यात अनेक ठिकाणी ॲनालॉग पनीर,आर्टिफिशियल पनीर म्हणून विकला जात आहे.त्यात दूधच नसते.
त्यांनी दावा केला की दररोज विक्री होणाऱ्या पनीर, चीजपैकी ७५ टक्के हे नकली असते.त्यातून ग्राहकांची फसवणूक होते आणि दूध उत्पादक कंपन्या, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की,या प्रश्नावर विक्रम पाचपुते यांच्यासह संबंधित आमदार,अधिकाऱ्यांची बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी घेऊन कारवाई केली जाईल. नकली पनीरला आळा घालण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री,पुरेसे मनुष्यबळ पुरविले जाईल.असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!