- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याची खरीप हंगाम २०२४-२५ या वर्षाची हंगामी पैसेवारी ही ७३ पैसे जाहिर करण्यात आली आहे.
खरीप पिकाची हंगामी पैसेवारी तहसिलदार यांचेकडून प्राप्त माहितीचे आधारे संकलीत करुन जाहीर करण्यात येते.गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८९ गावे असून खरीप पिकाची गावे १५५७ आहेत व एकूण पिकाखालील क्षेत्राच्या २/३ क्षेत्रामध्ये खरीप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गावांची संख्या ४ आहे. त्यापैकी खरीप गावामध्ये पीके नसलेली गावे ६१ आहेत.सदर खरीप पिक असलेल्या गावांपैकी ५० पैशाचे आत पैसेवारी असलेले एकही गाव नाही तर ५० पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकूण खरीप पिक असलेल्या गावांची संख्या १५०० आहेत.अशा प्रकारे एकूण १५०० खरीप पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आली असल्याचे गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
- Advertisement -

