- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-महिला सक्षमीकरणाकरिता राज्य शासनाने सुरू केलेल्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या टप्पा-२ कार्यक्रमाचे आयोजन येत्या ३१ ऑगस्ट रोजी नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमात ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार अहे.शहरी व ग्रामीण भागातील ५० हजार महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
योजनेसाठी विभागात २४ लाख ५ हजार २६३ लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहे.या योजनेच्या लाभासाठी अद्यापपर्यंत ऑनलाईन अर्ज न करणाऱ्या महिलांनी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावे; असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या १७ लाख २१ हजार १३६ अर्जाची छाननी करण्यात आली असून त्यापैकी १७ लाख १८ हजार ६६७ अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
विभागात सरासरी ९९.८७ टक्के अर्ज मंजूर झाले असून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे ३ हजार रुपये जमा करण्याला सुरुवात झाली आहे. दुसत्या टप्प्यात विभागात ६ लाख ८४ हजार १२७ अर्ज प्राप्त झाले असून या अर्जाची सुध्दा तालुका स्तरावरील समितीतर्फे तपासणी करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून आजपर्यंत ३ लाख ९६ हजार ७७९ अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
- Advertisement -

