Friday, June 26, 2026
Homeकुरखेडामालेवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या उदघाटनाचा मुहूर्तच सापडेना....- सहा महिन्यांपासून कार्यालय कुलूपबंद....

मालेवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या उदघाटनाचा मुहूर्तच सापडेना….- सहा महिन्यांपासून कार्यालय कुलूपबंद….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुनिश्वर बोरकर,गडचिरोली

गडचिरोली :- कुरखेडा तालुका मुख्यालयापासून १२ कि.मी.अंतरावरील मालेवाडा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय बांधुन सहा महिने लोटूनही उदघाटनाचा मुर्हत वन विभागाच्या कार्यालय प्रमुखांना सापडत नसल्याने सदर कार्यालय कुलूपबंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.

मालेवाडा वनविभाग कार्यालयाचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासुन सुरु होते.सदर बांधकामाची देखभाल आरमोरीचे वन परिक्षेत्र अधिकारी मेश्राम यांचेकडे होते.सुरवातीला थातूर-मातुर काम ठेकेदारामार्फत सुरू असल्याने कामाचा दर्जा व क्वॉलिटी पाहीजे त्या प्रमाणात नव्हती.रेतीची वाहतूक वैद्य की अवैध अशी शंका बळावली आहे.अश्याही परिस्थितीत गेल्या सहा महिण्यापूर्वी काम पुर्ण होऊन रंग,रंगोटी झाली असुन सदर कार्यालय कुलुपबंद अवस्थेत दिसून येत आहे.काही दिवसांपूर्वीच देलनवाडी वन परिक्षेत्र अधिकारी मेहर यांचेकडे अतिरिक्त पदभार आला असूनही आजतागायत इमारतीचे उदघाटन झालेले नसल्याने नागरिकांना व कर्मचाऱ्यांना आश्चर्यच वाटतो आहे.सदर बांधकाम झालेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी मालेवाडा कार्यालयाचे उद्घाटन लवकरात-लवकर करावे; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!