- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या सत्तेत विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा राजकीय मुद्यांवर सर्वेक्षण,अंदाज,मतचाचणींद्वारे भाष्य करणाऱ्या लोकपोलने केला आहे.विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल.याऊलट विद्यमान सत्ताधारी महायुतीला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळतील; असे लोकपोलने म्हटले आहे.
लोकपोलच्या त्यांच्या एक्स अकाउंटवर शेअर केलेल्या आकडेवारीनुसार,विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १४१ ते १५४ जागा मिळतील. म्हणजे राज्यात महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ जुळवण्यात यश येईल.याऊलट सत्ताधारी महायुतीला दुसऱ्या क्रमांकाच्या ११५ ते १२८ जागांवर समाधान मानावे लागेल. निवडणुकीत अपक्ष व इतर छोट्या पक्षांच्या मिळून ५ ते १८ जागा निवडून येण्याची शक्यता आहे.लोकपोलने महाराष्ट्रातील विभागनिहाय आकडेवारीही जाहीर केली आहे.त्यानुसार,मराठवाडा विभागातील ४६ पैकी १५ ते २० जागा महायुतीच्या,२५ ते ३० जागा मविआच्या, तर ० ते २ जागा अपक्ष किंवा इतर पक्षांच्या खिशात जाण्याचा अंदाज आहे.याशिवाय विदर्भातील ६२ जागांपैकी १५ ते २० जागा महायुतीला,तर ४० ते ४५ जागा महाविकास आघाडीला मिळण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातील ४७ जागांपैकी २० ते २५ जागा महायुतीला,तर महाविकास आघाडीलाही तेवढ्याच म्हणजे २० ते २५ जागा मिळण्याचा अंदाज आहे.या ठिकाणी इतर पक्ष ० ते २ जागांवर निवडून येऊ शकतात.ठाणे-कोकणातील ३९ जागांपैकी २५ ते ३० जागा सत्ताधारी महायुतीला तर ५ ते १० जागा महाविकास आघाडीला मिळतील.तर १ ते ३ आमदार येथे इतर किंवा अपक्षांचे निवडून येऊ शकतात.
लोकपोलच्या सर्व्हेनुसार,मुंबईतील ३६ पैकी १० ते १५ जागा महायुतीच्या खिशात जातील.तर २० ते २५ जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडतील.या विभागात ० ते १ जागा इतर पक्षांना मिळतील असे हे सर्वेक्षण सांगते.
पश्चिम महाराष्ट्रातील ५८ पैकी २० ते २५ जागा महायुतीच्या,तर ३० ते ३५ जागा महाविकास आघाडीच्या,तर १ ते ५ जागा इतर पक्षांना मिळतील, असेही हे सर्वेक्षण सांगते.
लोकपोलने कसा केला सर्व्हे?👇
लोकपोलने या निष्कर्षांसोबत आपण हा सर्व्हे नेमका कसा केला? याचीही माहिती दिली आहे.यासंबंधीच्या माहितीनुसार,या निष्कर्षांसाठी प्रत्येकी मतदारसंघातील ५०० अशा एकूण राज्यभरातील २८८ मतदारसंघांतील दीड लाख मतदारांच्या मतांचा विचार करण्यात आला.मतदार निवडीसाठी प्रत्येक मतदारसंघातील ३० मतदान केंद्रांची निवड करण्यात आली.२० ते ३० ऑगस्ट या १० दिवसांत हा सर्व्हे करण्यात आला.
मतदारांसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे? 👇
ग्रामीण भागातील असंतोष,महागाई,भ्रष्टाचार,कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश,महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का व बेरोजगारी या मुद्यांवर मतदार भाजपच्या विरोधात गेले.तसेच महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या प्रकल्पांचा मुद्दाही मतदारांसाठी महत्त्वाचा ठरला,असे या सर्व्हेच्या निष्कर्षांत नमूद करण्यात आले आहे.विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो; असेही यात नमूद करण्यात आले आहे.(सौजन्य-दिव्य मराठी)
- Advertisement -

