Saturday, August 8, 2026
Homeगडचिरोलीमराठी भाषा विभागाचे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित.. - नागरिक,विद्यार्थी व संशोधकांनी नवीन संकेतस्थळांचा...

मराठी भाषा विभागाचे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित.. – नागरिक,विद्यार्थी व संशोधकांनी नवीन संकेतस्थळांचा वापर करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागासह त्याच्या अधिनस्त कार्यालयांच्या एकूण सात संकेतस्थळांचे महाआयटी मार्फत नवीन डोमेनवर यशस्वी स्थलांतर करण्यात आले आहे.शासनाच्या धोरणानुसार संकेतस्थळांसाठी maharashtra.gov.in हे अधिकृत डोमेन वापरण्याच्या निर्णयानुसार ही कार्यवाही करण्यात आली असून,सर्व नवीन संकेतस्थळे आता नियमितपणे कार्यान्वित झाली आहेत.
मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त भाषा संचालनालय,राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संकेतस्थळांचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया गेल्या काही काळापासून महाआयटीच्या माध्यमातून सुरू होती.हस्तांतरणाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित संकेतस्थळे आता नव्या पत्त्यांवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या बदलानुसार मराठी भाषा विभागाचे पूर्वीचे marathi.gov.in हे संकेतस्थळ आता marathi.maharashtra.gov.in या पत्त्यावर उपलब्ध आहे.भाषा संचालनालयाचे संकेतस्थळ directorate-marathi.maharashtra.gov.in, तर राज्य मराठी विकास संस्थेचे संकेतस्थळ rmvs-marathi.maharashtra.gov.in या नवीन पत्त्यावर कार्यान्वित झाले आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे संकेतस्थळ आता sahitya-marathi.maharashtra.gov.in, तर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संकेतस्थळ marathivishwakosh.maharashtra.gov.in या पत्त्यावर उपलब्ध आहे.विश्वकोशाच्या प्रथमावृत्तीतील खंडांसाठीचे संकेतस्थळ vishwakosh-marathi.maharashtra.gov.in, तर मराठी परिभाषा कोशाचे संकेतस्थळ shabdakosh-marathi.maharashtra.gov.in या नव्या पत्त्यावर उपलब्ध करण्यात आले आहे.
संकेतस्थळांच्या तांत्रिक व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात येत असल्याने संबंधित संकेतस्थळे तातडीने नवीन प्रणालीशी अनुकूल करण्यात आली आहेत. स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे पूर्वीची संकेतस्थळे आता नवीन संकेतस्थळांवर नियमितपणे कार्यान्वित करण्यात आली असल्याचे मराठी भाषा विभागाने स्पष्ट केले आहे.
या संकेतस्थळांवर मराठी भाषा,साहित्य,संस्कृती, मराठी विश्वकोश,परिभाषा कोश तसेच विभागाच्या विविध उपक्रमांशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे.त्यामुळे नागरिक,संशोधक,अभ्यासक,विद्यार्थी, साहित्यिक,साहित्यप्रेमी तसेच शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी यापुढे नवीन संकेतस्थळांची नोंद घेऊन त्यांचा वापर करावा.तसेच या बदलाची माहिती सर्व संबंधितांपर्यंत पोहोचवावी,असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ.नामदेव भोसले यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!