Wednesday, August 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न फसला; दोघेजण ताब्यात..

मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न फसला; दोघेजण ताब्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील काही नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांना तात्पुरती स्थगिती दिल्याने आज,मंगळवार २ डिसेंबर रोजी राज्यातील एकूण २८८ पैकी २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. जवळपास दहा वर्षांच्या कालखंडानंतर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांमध्ये या निवडणूक प्रक्रियेविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्यातच विरोधकांनी सत्ताधारी पक्षांसह राज्य निवडणूक आयोगावर बोगस मतदानाचे आरोप केल्यामुळे राजकारण तापले आहे.या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात २ बोगस मतदारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.हे  दोघेही दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न करत होते.पण,निवडणूक अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला आणि ते अलगद जाळ्यात अडकले.आज बुलढाणा नगर परिषद निवडणुकीसाठी सकाळी मतदानाला सुरुवात झाली.त्यानंतर दीड तासातच प्रभाग क्रमांक-१५ मधील गांधी प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न झाला.त्यात बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याच्या कोथळा येथील एका व्यक्तीने वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावाने बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला.पण,हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने हे मतदान टळले.त्याच्यासोबत अन्य एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.दुसरीकडे, काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कोथळी व इब्राहिपूर येथून अनेक लोक बोगस मतदानासाठी आणण्यात आल्याचा आरोप केला आहे.बोगस मतदान करण्याच्या प्रयत्नाने आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!