Sunday, April 19, 2026
Homeनागपूरभीमसैनिकांच्या गर्दीने फुलून गेला दीक्षाभूमी परिसर.. - यंदा प्रथमच मंचावर कुठल्याही राजकीय...

भीमसैनिकांच्या गर्दीने फुलून गेला दीक्षाभूमी परिसर.. – यंदा प्रथमच मंचावर कुठल्याही राजकीय नेत्याला स्थान नाही..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शतकानुशतके धार्मिक व्यवस्थेच्या गुलामगिरीत जखडलेल्या शोषित,पीडितांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माची दीक्षा देऊन नवी क्रांती घडविली.त्या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी महामानवाने मनामनात चेतवलेली समतेची मशाल हाती घेत देश-विदेशातील लाखोंचा जनसागर काल शनिवारी दीक्षाभूमीवर अवतरला. ‘जय भीम’ हा क्रांतीचा नारा देत भीमसैनिक तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक झाले.
हातात पंचशील ध्वज,पांढरा पोशाख,उरात भरलेला प्रचंड आत्मविश्वास घेऊन देशाच्या कानाकोपऱ्यातील खेड्यापाड्यांमधून लाखो अनुयायी दोन दिवसांपासून महामानवाला अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर पोहोचत आहेत.त्यामुळे हा संपूर्ण परिसर भीमसैनिकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
सकाळी धम्म ध्वजारोहणासह समता सैनिक दलाच्या सैनिकांनी दीक्षाभूमी परिसरात पथसंचलन व तथागत बुद्ध व डॉ.बाबासाहेबांना मानवंदना दिली.
त्यानंतर दीक्षाभूमी स्मारक नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वात भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्धवंदना तसेच महापरित्राण पाठ करण्यात आले.
सोबत २२ प्रतिज्ञांचे पठण करण्यात आले.तसेच देशभरातून आलेल्या इच्छुक नागरिकांनी भिक्खू संघाकडून बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली.दिवसभर लाखो अनुयायांनी मुख्य स्मारकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत अभिवादन केले.धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा देश-विदेशातील भिक्खू संघांच्या उपस्थितीत पार पडला.
यंदा प्रथमच मंचावर कुठल्याही राजकीय नेत्याला स्थान दिले नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!