- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-अनुसुचित जाती,जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेयर लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज २१ ऑगस्ट रोजी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह देसाईगंज,चामोर्शी, कुरखेडा,मुलचेरा आदी तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळून धरणे आंदोलन करण्यात आले.

देशातील महान संत,थोर महापुरूषांनी सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी जनजागृती केली. महत्प्रयासान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक एकता प्रस्थापित करण्यासाठी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती समाजाला संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली.त्याला संवैधानिक मान्यता प्रदान केली.त्यामुळे अनुसूचित जाती,अनुसूचित जमातींच्या लोकांमध्ये सामाजिक एकता निर्माण झाली,अन्यायाविरूध्द लढण्याची कुवत निर्माण झाली.मात्र,अनुसूचित जाती, जमातींमधील एकता तोडून या प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा तथा सर्व प्रवर्गाला क्रिमिलेअर लावण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती,जमातींचे आरक्षण संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही; त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्णया विरोधात अनुसूचित जाती, जमातींमधील सर्व समाज एकवटला असून आज, बुधवार दिनांक-२१ ऑगस्ट रोजी सामुहीक कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.त्यामुळे सगळीकडेच देसाईगंज व इतर तालुक्यात शुकशुकाट दिसून आला.
प्रमुख मागण्या👇
केंद्र सरकारने संसदेत अध्यादेश काढून तात्काळ अनुसूचित जाती,जमातींच्या प्रवर्गातील प्रस्तावित जातींचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअरचा निर्णय रद्द करावा.त्याविषयी संसदेत कायदा पारित करून अशाप्रकारचे उपवर्गीकरण अथवा क्रिमिलेअर लावण्यात येणार नाही याची हमी द्यावी.अनुसूचित जाती,जमातीच्या आरक्षणामध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर हस्तक्षेप करू नये उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची निवड करतांना कॉलेजीअम सिस्टम बंद करून न्यायिक नियुक्ती आयोग गठीत करून,परिक्षा घेऊन करण्यात यावी; इत्यादी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
- Advertisement -

