Tuesday, July 7, 2026
Homeनागपूरभाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

भाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-खापरखेडा-नांदा मार्गावरील तलावात भाजप नेते रमेश लोढे यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन रमेश लोढे वय ३७ वर्षे,रा.वॉर्ड क्र.३,खापरखेडा,जि.नागपूर असे मृताचे नाव असून,त्याच्या मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.घटनास्थळावरील परिस्थिती पाहता पोलिसांनी हत्या आणि आत्महत्येच्या दोन्ही शक्यतांवर तपास सुरू केला आहे.
शनिवारी सकाळी स्थानिक नागरिकांना तलावात एक मृतदेह तरंगताना दिसला.याची माहिती मिळताच कोराडी पोलिसांनी स्थानिक मासेमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.प्राथमिक अंदाजानुसार मृतदेह काही दिवसांपासून पाण्यात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.घटनास्थळाचा पंचनामा करतांना तलावाच्या काठावर एमएच-४०-डी-६२३१ क्रमांकाची दुचाकी बेवारस अवस्थेत आढळली.या वाहनाच्या आधारे पोलिसांनी मृताची ओळख पटविली.मात्र, सचिन तलावाजवळ कसा पोहोचला,याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.विशेष म्हणजे,सचिन लोढे यांनी दोन दिवसांपूर्वी कुटुंबीयांना शिर्डीला दर्शनासाठी जात असल्याचे सांगून घर सोडले होते.शिर्डीला जाण्याऐवजी ते कोराडी परिसरात कसे पोहोचले,याचा तपास पोलिस करीत आहेत.शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच सदरचे प्रकरण हत्येचे की आत्महत्येचे,हे स्पष्ट होईल.कोराडी पोलीस या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत आहेत.घटनेने परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!