Tuesday, September 1, 2026
Homeगोंदियाभरधाव वेगात असणारा ट्रॅक्टर घुसला घरात; दोन मुली बचावल्या तर महिलेचा जागीच...

भरधाव वेगात असणारा ट्रॅक्टर घुसला घरात; दोन मुली बचावल्या तर महिलेचा जागीच मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- मृत्यू कसा आणि कोठे होईल सांगणे कठीण आहे.अशाच एका घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे.सकाळी रस्त्याने जाणारे एक भरधाव ट्रॅक्टर घरात घुसला व कपडे धुत असलेल्या महिलेच्या अंगावर गेला.यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.तर घरात असलेल्या दोन मुली थोडक्यात बचावल्या.सदरची घटना आमगाव नगर परिषद भागातील किडांगीपार परिसरात घडली.किसना बुधराम चोरवाडे वय ५८ वर्षे या आपल्या घरासमोर कपडे धुत होत्या.याचवेळी अचानक समोरून संदीप कोरे हा ट्रॅक्टर चालवीत आपल्या शेतातून धान घेऊन येत होता.चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याने त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि किसनाबाई यांच्या घरामध्ये ट्रॅक्टर गेले.ट्रॅक्टरच्या चाकामध्ये येऊन किसणाबाई यांचा जागेवरच करून अंत झाला.त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या दोन नात जवळच होत्या.या घटनेत त्या थोडक्यात बचावल्या.अन्यथा ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळे तिघांचा जीव गेला असता.मात्र या ट्रॅक्टर चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे किसनाबाई यांचा मृत्यू झाला आहे.विशेष म्हणजे या अपघातातील ट्रॅक्टर आरटीओ द्वारा पासिंग केला नसून ट्रॉली अद्यापही विना नंबर आहे.ट्रॉली सुद्धा आरटीओद्वारा पासिंग केल्याचे दिसून येत नाही.याबाबत आमगाव पोलीस पुढील तपास करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!