Tuesday, July 7, 2026
Homeबिहारबोगस डॉक्टरने तरुणीचा केला गर्भपात.....- पुरावा नष्ट करण्यासाठी जे कृत्य केले; वाचून...

बोगस डॉक्टरने तरुणीचा केला गर्भपात…..- पुरावा नष्ट करण्यासाठी जे कृत्य केले; वाचून चक्रावून जाल 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

बिहार :- हाजीपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.एका बोगस डॉक्टर दाम्पत्याने त्यांच्या बेकायदेशीर नर्सिंग होममध्ये प्रथम मुलीचा गर्भपात केला.त्यानंतर मुलीची तब्येत बिघडल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी भृण कुत्र्याला खायला दिले. यादरम्यान या तरुणीचाही मृत्यू झाला.मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांविरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यावर ही बाब उघडकीस आली.

पोलीस तपासात सदर नर्सिंग होम देखील बेकायदेशीर असल्याचे उघड झाले आहे.तसेच डॉक्टर दाम्पत्याकडे एमबीबीएसची डिग्री नसल्याचेही उघडकीस आले आहे.घटनेनंतर आरोपी डॉक्टर दाम्पत्य फरार झाले आहेत.पोलिस फरार दाम्पत्याचा शोध घेत आहेत.

वैशाली जिल्ह्यातील बालीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंपापूर अग्रेल येथे भयावह घटना घडली आहे.मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार तरुणीच्या नातेवाईकांना नर्सिंग होम बेकायदेशीर असल्याची माहिती नव्हती.डॉक्टरांनी तरुणीवर उपचार सुरु केले. मात्र तिचा गर्भपात झाला आणि तिची तब्येत बिघडू लागली.यामुळे डॉक्टर दाम्पत्य घाबरले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी नवजात अर्भक आपल्या पाळीव कुत्र्याला खायला दिले.दुसरीकडे मुलीची प्रकृती खालावल्याचे पाहून नातेवाइकांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.डॉक्टर दाम्पत्याच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.सध्या डॉक्टर दाम्पत्य फरार आहे त्यांचा शोध सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

तारेवर ओले कपडे वाळवायला गेली अन् क्षणात जीव गमावून बसली..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-घरातील कपडे धुवून घराशेजारी असलेल्या विद्युत खांबाच्या बाजूला असलेल्या अर्तींग तारेवर ओले कपडे वाळवतांना विद्युतचा जोरदार शॉक लागून एका ४५ वर्षीय महिलेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!