Wednesday, August 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मिळणार हॉल तिकीट..

बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मिळणार हॉल तिकीट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे होणाऱ्या बारावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या,सोमवार १२ जानेवारीपासून परीक्षेचे हॉल तिकीट(प्रवेशपत्र)दिले जाणार आहे. बारावीची परीक्षा ही फेब्रुवारीत सुरु होणार आहे. त्यासाठी एक महिनाभर आधी म्हणजे येत्या,१२ जानेवारीपासून हॉल तिकीट दिले जाणार आहे.सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर सोमवारपासून उपलब्ध होणार आहेत. बारावीची परीक्षा ही १० फेब्रुवारी ते १८ मार्च रोजी होणार आहे.या कालावधीत परीक्षेला जातांना विद्यार्थ्यांकडे प्रवेशपत्र असणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्राच्या प्रतीवर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही असणे आवश्यक आहे,अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत.प्रवेश पत्रावर फोटो असल्यावर त्यावर मुख्याध्यापक,प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे.यानंतरच प्रवेशपत्र ग्राह्य धरले जाईल. बारावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यानंतर मंडळाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या प्रवेशपत्राची प्रत काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहे.यासाठी कोणतेही वेगळे शुल्क लागणार नाही,मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!