Friday, May 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबांबू लागवड अभियान; बांबू लागवड करून मिळवा सात लाखांचे अनुदान..

बांबू लागवड अभियान; बांबू लागवड करून मिळवा सात लाखांचे अनुदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे तसेच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे म्हणून राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे.पडीक जमीन लागवडीखाली आणून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी बांबू लागवडीचे अभियान राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत विविध जिल्ह्यात वेगवेगळे बांबू लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत.मनरेगांतर्गत ग्रामपंचायतींनाही उद्दिष्ट देण्यात आले असून त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

मग्रारोहयो योजनेंतर्गत बांबू मिशन अभियान राबविण्यात येत आहे.त्यासाठी पंचायत समिती कृषी विभाग,वनपरिक्षेत्र अधिकारी,वनविभाग,सामाजिक वनीकरण विभागाकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे सात लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे.पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे.यात वैयक्तिक लाभार्थी,शेतकरी किंवा बचत गट महिला यांना सात लाखांचे अनुदान देण्यात येते.वैयक्तिक लाभासाठी लाभार्थीकडे दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र असावे.लाभार्थीचे संमतीपत्र,नरेगा जॉबकार्ड,७/१२, ८-अ उतारा,ग्रामपंचायतीचा ठराव,लाभार्थीचे बँक पासबुक, आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.पाऊस कमी अथवा जास्त झाला तरी बांबूला नुकसान होत नाही.बांबूच्या बेटात दरवर्षी ८ ते १० बांबू तयार होतात. इतर पिकांच्या तुलनेत बांबू शेतीवर ३०-४० टक्के खर्च कमी येतो.तिसऱ्या वर्षीपासून उत्पादन काढता येत असल्याने शाश्वत उत्पन्न मिळू शकते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!