Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीबांधकाम कामगारांची नोंदणी कोणत्याही एजंट, दलाल,मध्यस्थ किंवा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत नाही-...

बांधकाम कामगारांची नोंदणी कोणत्याही एजंट, दलाल,मध्यस्थ किंवा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत नाही- सरकारी कामगार अधिकारी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची नोंदणी,नुतणीकरण करण्यात येऊन त्यांना विविध योजनांचे लाभ दिले जातात.नोंदणी,नुतणीकरण व लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यावर कर्मचारी व नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत अर्ज निकाली काढले जातात.अर्ज मंजूर/नामंजूर हे एसएमएस(SMS)द्वारे कारणासह कामगारास कळविल्या जाते.सदरच्या सेवा मंडळामार्फत नि:शुल्क राबविण्यात येतात.बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनाचा लाभ थेट त्यांच्या बँकेच्या खात्यात देण्यात येत असून,या करीता कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.हि सर्व कामे ऑनलाईन असून ते कोणत्याही एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत नाही.या ऑनलाईन कामाकरीता कोणीही पैशाची/कमिशनची/लाचेची मागणी केल्यास मंडळाच्या जिल्हा कार्यालयास किंवा लाचलूचपत प्रतिबंधक विभागास तक्रार करावी,अशा प्रकारच्या सुचना मंडळाच्या प्रत्येक जिल्हा कामगार सुविधा केंद्र व तालुका कामगार सुविधा केंद्र येथे लावण्यात आलेल्या आहेत.
नोंदणी,नुतणीकरण व लाभासाठी अर्ज प्राप्त झाल्यावर कामगारास त्याने निवडलेल्या तारखेस कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येते.लाभाच्या अर्जासंदर्भातील उपस्थित राहण्याबाबतच्या पत्रात देखील मंडळाकडून देण्यात येणारे लाभ हे विनामूल्य असून,कोणाकडूनही पैशाची अथवा लाचेची मागणी झाल्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या नि:शुल्क क्रमांक-१०६४ अथवा दुरध्वनी क्रमांक अथवा ईमेल acbwebmail@mahapolic.gov.in वर तक्रार नोंदवावी,असे नमूद केलेले आहे.त्यामुळे कामगारांची कोणत्याही आमिषाला बळी पडू नये.बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी पात्र असलेल्या कामगारांनीच नोंदणी करण्याचे नियोक्ता/ठेकेदार यांनी त्यांचेकडे काम करीत असलेल्या व नोंदणीसाठी पात्र असलेल्या बांधकाम कामगारांच ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देण्याचे, तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक किंवा महानगरपालिका/नगरपरिषद/ नगरपंचायत यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांनी बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी पात्र असलेल्या बांधकाम कामगारांनाच ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र निर्गमित करावेत,असे आवाहन सिमा व शिंदे उप जिल्हा कार्यकारी अधिकारी,महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार,कल्याणकारी मंडळ तथा सरकारी कामगार अधिकारी,गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!