- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत कामगार म्हणून नोंदणी करणाऱ्या कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो.जिल्ह्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी नोंदणी व नूतनीकरणाचे काम सुरू होते.तसेच कामगार किटचे वितरण होणार असल्याची चर्चा सुरू होती.परंतु,आचारसंहिता सुरू झाल्यानंतर नोंदणीची प्रक्रिया थांबविण्यात आली.त्यामुळे कामगारांना नवीन सरकार सत्तारूढ होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत वर्षभर नोंदणी व नूतनीकरणाची मोहीम सुरू असते.सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने नवीन नोंदणी व नूतनीकरण तसेच लाभ वितरणाचीही प्रक्रिया थांबली आहे.इमारत व इतर बांधकाम क्षेत्राशी संबंधित कामगारांनी नोंदणी केल्यास त्यांना संरक्षक किटसह विविध साहित्याचा लाभ दिला जातो.हा लाभ मिळावा,यासाठी कामगार नोंदणी करतात.परंतु,सध्या विधानसभा निवडणूक आचारसंहिता सुरू आहे.त्यामुळे आता निवडणूक संपेपर्यंत म्हणजे साधारणतः महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
- Advertisement -

