Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबस कंडक्टरने १ रुपया परत दिला नाही म्हणून गेला ग्राहक तक्रार मंचात;...

बस कंडक्टरने १ रुपया परत दिला नाही म्हणून गेला ग्राहक तक्रार मंचात; मिळाली एवढी रक्कम…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- बसमध्ये कंडक्टरसोबत सुट्ट्या पैशांवरुन वाद झाला नसेल असा एकही माणूस शोधून सापडणार नाही.जो जो बसने प्रवास करतो; त्याच्यासोबत कधी ना कधी असा वादाचा प्रसंग घडला असेलच.असे वाद झाल्यानंतर शक्यतो प्रवाशी वाद आटोपता घेतात. काहीजण वरचे सुट्टे पैसे सोडून देतात.दुकानात देखील खरेदी दरम्यान सुट्टे पैसे नसले तर दुकानदार आपल्याला नको असलेले चॉकलेट जबरदस्ती गळ्यात मारतो.बंगळुरुमध्ये एका बसमध्ये सुट्ट्या पैशांवरुन असाच एक वाद झाला.पण प्रवाशी इतका चिवट निघाला की,त्याने थेट ग्राहक न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.न्यायालयाने देखील या प्रवाशाची मागणी ऐकून घेत त्याला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. या आदेशामुळे सदर प्रवाशाला एक रुपयांच्या बदल्यात हजारो रुपयांची नुकसान भरपाई मिळाली.

२०१९ साली रमेश नाइक हे बीएमटीसी (Bangalore Metropolitan Transport Corporation) च्या बसने प्रवास करत होते. शांतीनगर ते मॅजेस्टीक बस डेपोपर्यंत जाण्यासाठी नाइक यांनी तिकीट काढले. तिकीटाचा दर २९ रुपये एवढा होता. नाइक यांनी कंडक्टरला तीन रुपये दिले. मात्र वरचा एक रुपया कंडक्टरकडून नाइक यांना मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या नाइक यांनी थेट जिल्हा ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

ग्राहक न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. नाइक यांनी एक रुपयाच्या बदल्यात १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई मागितली.त्यानंतर न्यायालयाने आदेश दिला की, बीएमटीसीने नाइक यांना दोन हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच तक्रारदाराचे कायदेशीर प्रक्रीयेसाठी खर्च झालेले १ हजार रुपयेही देण्यात यावेत. यामुळे नाइक यांना एक रुपयांच्या बदल्यात तीन हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळाली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!