- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील स्फोटके बनवणाऱ्या एसबीएल कंपनीत १ मार्च २०२६ रोजी भीषण स्फोट झाला होता.एसबीएल कंपनीच्या आवारात झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत २६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर कंपनीचे संचालक आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत.यात एसबीएल कंपनीचे मालक तथा अध्यक्ष संजय चौधरी,मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक चौधरी तसेच रवींद्र पोखर्णा,श्रवण कुमार, सत्यवती पराशर, आलोक अवधिया,मनोज कुमार प्रसाद,मितिन चंदनमल,अतुल गुप्ता आणि केदार पंचपुत्रे यांना अद्याप अटक झालेली नाही.या सर्व आरोपींविरुद्ध यापूर्वीच अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले असून,त्यांना ‘फरार गुन्हेगार’ घोषित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यातच,त्यांच्या विरोधात ‘लुकआउट सर्क्युलर’ जारी करण्यात आले असून त्यांना देशाबाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.या प्रकरणात आतापर्यंत अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनीतील विविध पदांवरील अधिकारी समाविष्ट आहेत.अश्यातच मुख्य आरोपींना ‘फरार’ घोषित करण्याची तयारी नागपूर ग्रामीण पोलिसांनी सुरू केली आहे.त्याचबरोबर,फरार आरोपी शरण आले नाहीत,तर त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे.विशेष म्हणजे,तपासादरम्यान कारखान्यातील सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले आहे. ‘पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्था’ तसेच ‘औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय’ यांच्या अहवालांत सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.कारखान्यात स्फोटके दीर्घकाळ साठवून ठेवण्यात आली होती.तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण न देताच धोकादायक कामे करवून घेतली जात होती.
- Advertisement -

