Friday, July 17, 2026
Homeनागपूरपोलीस हवालदाराची तलावात उडी घेऊन आत्महत्या..

पोलीस हवालदाराची तलावात उडी घेऊन आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका ४५ वर्षीय पोलीस हवालदाराने नागपूरच्या अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिलरत्न भीमराव बेलेकर वय ४५ वर्षे,रा.वाघदरी इसासनी असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून अलीकडेच काही महिन्यांपूर्वी हिंगणा पोलीस ठाण्यातून त्यांची बदली होऊन प्रतापनगर पोलीस ठाण्यात झाली होती.प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
शिलरत्न यांचा पत्नीशी गेल्या दोन वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता.त्यामुळे ते दोन्ही मुलांसह इसासनी भागातल्या वडिलोपार्जित घरी रहात होते.त्यांचा एक मुलगा आठवीत तर दुसरी मुलगी चौथीच्या वर्गात शिकते.गेल्या काही दिवसांपासून पत्नी मुलांचा ताबा मागत असल्याने शिलरत्न नैराश्यात गेले होते.१९ फेब्रुवारीपासून ते पोलीस ठाण्यात गैरहजर होते.दरम्यान घरीही नसल्याने त्यांच्या भावाने तीन दिवसांपूर्वी शिलरत्न बेपत्ता झाल्याची तक्रार प्रतापनगर पोलिस ठाण्यात दिली होती.दरम्यान,काल सकाळी अंबाझरी तलावात पोहत असलेल्या काही तरुणांना एक मृतदेह दिसला.त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह तलावाबाहेर काढून तपासणी केली असता त्यात शिलरत्नचे ओळखपत्र सापडले. अंबाझरी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला पाठवला.घटनेने कुटुंबियांवर मोठा आघात झाला असून प्रकरणाचा पुढील तपास अंबाझरी पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!