Saturday, September 26, 2026
Homeपुणेपोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा शोध मोहिमेत चक्क मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.विजय मोतीलाल कोळी वय ३६ वर्षे असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून ते पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नियंत्रण कक्षात(आरटीपीसी)कार्यरत होते.विजय कोळी हे बुधवार २३ सप्टेंबर रोजी कौटुंबिक वादानंतर सकाळच्या सुमारास घरातून निघून गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाही.कुटुंबियांकडून त्यांचा शोध घेतला जात होता.पण,त्यांचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने त्यांच्या पत्नी सारिका विजय कोळी यांनी बेपत्ता असल्याची तक्रार चिखली पोलिस ठाण्यात नोंदवली होती.विशेष म्हणजे,विजय कोळी हे घरून निघून गेले त्यावेळेस त्यांच्याकडे सर्विस रिव्हॉल्वर (सरकारी पिस्तूल)असल्याचे समोर आल्याने पोलिस यंत्रणेने त्यांचा शोध सुरू केला होता.त्यांचे शेवटचे लोकेशन पिंपरी-चिंचवड शहराच्या निगडीतील दुर्गादेवी टेकडी परिसरात आढळल्याने त्या भागात पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवली.ड्रोनच्या सहाय्यानेही परिसर पिंजून काढण्यात आला होता.दरम्यान,आज शनिवारी सकाळच्या सुमारास निगडी ट्रान्सपोर्टनगर येथील बस डेपो परिसरात विजय कोळी यांचा मृतदेह आढळून आला.घटनास्थळी सर्विस रिव्हॉल्वरही मिळून आली.प्राथमिक तपासात त्यांनी सर्विस रिव्हॉल्वरमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर,पुढील प्रक्रिया पार पाडून तपास सुरू केला आहे.घटनेने पिंपरी-चिंचवड पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात असून कोळी कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

धक्कादायक..! धावत्या ट्रेनवर दगडफेक; काचांचे तुकडे प्रवाशांच्या जेवणात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.दगडफेकीत ट्रेनच्या एसी कोचच्या खिडक्यांच्या काचा फुटून काचांचे तुकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!