Monday, September 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी दोन ग्रामस्थांची गळा चिरून केली हत्या..!

पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी दोन ग्रामस्थांची गळा चिरून केली हत्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सुरक्षा दलांच्या धडक कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले आहेत.जंगल तसेच परिसरातील गावांमध्ये नक्षलवाद्यांना आश्रय घेणे कठीण झाले आहे.पुढील काळात नक्षलवाद्यांचा सुकडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही.आपला अंत आता निकट येऊ लागला आहे,असे नक्षलवाद्यांना वाटू लागल्याने निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. संतापलेल्या नक्षलवाद्यांनी भ्याड कृत्य केल्याची घटना छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. काल मंगळवारच्या रात्री सुकमा जिल्ह्याच्या केरळपाल पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिरसेट्टी पंचायतीच्या नंदापारा गावातील दोन ग्रामस्थांना झोपेतून उठवत घरातून उचलून दूरवर जंगल परिसरात नेले व तुम्ही मोबाईलवरून पोलिसांना माहिती देता,असे म्हणून दोघांचाही धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली.देवेंद्र पदमी आणि पोज्जा पदमी असे हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.त्यातच पोलिसांचे खाबरी असल्याच्या संशयावरून दोन गावकऱ्यांनाही मारहाण केली. दोघांच्याही पायांना आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे.प्रकरणी पोलिसांना घटनेची माहिती होताच घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे पत्रक आढळून आले. त्यात त्यांनी लिहिले की,१० एप्रिल रोजी त्याने पोलिसांना माहिती देऊन आमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला.तो २०२२ मध्ये खबऱ्या म्हणून काम करत आहे.यासोबतच त्याच्यासारख्या खबऱ्यांना आणि लोकविरोधी काम करणाऱ्यांना अशी मृत्युदंडाची शिक्षा मिळेल,असे लिहिले आहे.नक्षलवाद्यांच्या कृत्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!