Wednesday, April 29, 2026
Homeनागपूरपोटात दुखू लागल्याने झाला भांडाफोड; अल्पवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती.. - तरुणावर...

पोटात दुखू लागल्याने झाला भांडाफोड; अल्पवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती.. – तरुणावर अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-वयात आल्यानंतर मुला-मुलींमध्ये एकमेकांविषयी आकर्षण वाढते आणि तिथूनच पुढे सुरू होतेय अनोखी ‘लव्हस्टोरी’ ही काही सांगण्याची गरज नाही.पण,अल्पवयीनांची ‘लव्हस्टोरी’ चिरकाल टिकणारी नसतेच,हेही तितकेच खरे.यात सापडला तर गुन्हेगार, नाहीतर..न बोललेलं बरं.! अश्यातच एका १९ वर्षीय युवकाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे,पीडित मुलगी इयत्ता दहावीत शिक्षण घेत असतांनाच तसेच ती पूर्व नागपूरमध्ये एका शिकवणी वर्गात जात असल्याच्या कालावधीत तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान,२३ एप्रिल २०२६ रोजी विद्यार्थिनीच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले.तिथे ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले आणि तिने सर्व आपबिती कथन केली.प्रकरणी कुटुंबीयांनी नंदनवन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.हर्षल युवराज नारनावरे वय १९ वर्षे, रा.वाठोडा रोड,हिवरीनगर,नागपूर असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्यांच्यावर अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
मागील वर्षी १० जून २०२५ रोजी विद्यार्थिनी शिकवणी वर्गाला जात असतांना हर्षलने तिला थांबवले आणि त्याच्या दुचाकीवर बसण्यास सांगितले.तिने नकार दिल्यावर त्याने तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली.त्यानंतर,हर्षल त्या विद्यार्थिनीला बिडगावमधील एका मित्राच्या लॉजमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.तिने याबद्दल कुठेही वाच्यता केल्यास तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी त्याने दिली.यानंतर, हर्षलने त्या विद्यार्थिनीवर ४ ते ५ वेळा अत्याचार केला.मात्र,मुलीच्या पोटात दुखू लागल्याने संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड होऊन तरुणास बेड्या पडल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

आता ‘त्या’ आमदार अन् खासदारांना उठून अभिवादन करण्याची गरज नाही..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील कित्येक आमदार आणि खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अश्यातच काहीजणांवर फौजदारी कारवाई झालेली वा इतर प्रकरणात दोषी ठरलेले...

गडचिरोलीचे पत्रकार सुरज गुंडमवार राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार-२०२६’ ने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सामाजिक,शैक्षणिक व बहुउद्देशीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आश्रयआशा फाऊंडेशन मालेगाव(जि.नाशिक)तर्फे प्रदान करण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय ‘शिवछत्रपती पुरस्कार-२०२६’ गडचिरोलीचे पत्रकार सुरज गुंडमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!