Saturday, June 20, 2026
Homeगडचिरोलीपावसाळ्यापूर्वी मार्कंडा मंदिर परिसरातील विकास कामे पूर्ण करण्याचे निर्देश.. - राज्याच्या मुख्य...

पावसाळ्यापूर्वी मार्कंडा मंदिर परिसरातील विकास कामे पूर्ण करण्याचे निर्देश.. – राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मार्कंडा मंदिरास भेट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील ऐतिहासिक मार्कंडा शिव मंदिर परिसरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.सौनिक यांनी आज,गुरुवारी २३ जानेवारीला मार्कंडा मंदिराला भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील,जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे,सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्य सचिवांनी मंदिर परिसरातील घाट,वाहनतळ, बगीचा यांसारख्या कामांची प्रगती तपासून ती चार महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.त्यांनी मार्कंडा परिसराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देणारे भव्य स्वरूप देण्याच्या सूचना दिल्या.त्यात जुन्या ऐतिहासिक साक्षीदार प्रवेशद्वाराची उभारणी, शिर्डीच्या धर्तीवर प्रसादालय,बैठक व्यवस्था, पुस्तकालय,प्राचीन माहिती केंद्र यांची उभारणी आणि शेगाव मंदिराप्रमाणे स्वच्छतेचे नियोजन यांचा समावेश करण्याचे सांगितले.
मंदिर परिसरात भाविकांसाठी सुयोग्य रस्ता आणि वाहनतळ उभारणे,भक्तनिवास दुरुस्ती व त्यासाठी ऑनलाइन बुकिंगची पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देशही देण्यात आले.मंदिरालगतचे ग्रामपंचायत कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी ठराव मंजूर करून स्थानिक ग्रामस्थांची संमती तातडीने मिळवण्यावर भर देण्याचे सांगून त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी व नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामास मंजुरी देणे सोयीचे होईल,असेही त्यांनी सांगितले.पुरातत्त्व विभागाद्वारे मुख्य मंदिराचे सुरू असलेल्या बांधकामांना गती देण्याचे प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मुख्य सचिवांनी या विकास कामांमध्ये विलंब न करता पावसाळ्यापूर्वीच सर्व कामे पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले.त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी वेळेवर निर्णय घेऊन कामे गतिमान करावीत,असेही निर्देश त्यांनी दिले.यावेळी पुरातत्त्व विभाग,सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अधिकारी तसेच मंदिराचे विश्वस्त, पुजारी,सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!