Wednesday, October 28, 2026
Homeनागपूरपत्नीला व्हिडिओ कॉल करीत पतीने संपविली जीवनयात्रा...

पत्नीला व्हिडिओ कॉल करीत पतीने संपविली जीवनयात्रा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-वारंवार विनंती करूनही माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने वैतागलेल्या पतीने तिच्या विरहात घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली असल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या कामठी (नवीन) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील न्यू येरखेडा येथे रविवारीच्या  मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.
कमलराम नथुराम सिन्हा वय २२ वर्षे,रा.साईप्रसाद लेआऊट,न्यू येरखेडा,ता.कामठी असे मृताचे नाव आहे.कमलरामने दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. त्याला एक वर्षांचा मुलगा आहे.आई-वडिलांशी पटत नसल्याने तो येरखेडा येथे वेगळा राहात होता.सहा महिन्यांपूर्वी त्याची पत्नी माहेरी कन्हान,ता.पारशिवनी येथे गेली.तिला परत आणण्यासाठी त्याने खूप विनंती व प्रयत्न केले.मात्र,त्याला यश आले नाही.
त्याने रविवारी मध्यरात्री त्याच्या खोलीत छताच्या हुकला ओढणीच्या मदतीने गळफास लावून घेतला. आई वडिलांना कळताच त्यांनी दार तोडून त्याला खाली उतरविले आणि हॉस्पिटलमध्ये नेले.तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश पठाडे करीत आहेत.
कमलरामने रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास विषारी औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला नागपूर शहरातील मेयो हॉस्पिटलमध्ये भरती केले होते.थोडे बरे वाटताच त्याने कुणालाही न सांगता हॉस्पिटलमधून पळ काढला होता.त्या रात्री त्याने आई-वडिलांसोबत जेवण केले आणि पत्नीला व्हिडिओ कॉल करून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले होते.पत्नीने लगेच त्याच्या आई-वडिलांना कळविले.मात्र,तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!