- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राज्याच्या अनेक शहरात निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.येत्या,२ डिसेंबर रोजी मतदान होणार असून नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.या तारखेनंतर उमेदवारांना केवळ पाचच दिवस प्रचारासाठी उपलब्ध राहणार असल्याने प्रत्येक उमेद्वाराला मतदारांच्या घराघरांत पोहोचण्यासाठी अक्षरशः धावपळ करावी लागणार आहे.नामनिर्देशन परत घेण्याची मुदत २५ नोव्हेंबरपर्यंत असून,उमेदवार ‘होम टू होम’ संपर्कासाठी नियोजनबद्ध रणनीती आखत आहेत. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच प्रमुख पक्षांमध्ये ‘इनकमिंग-आउटगोइंग’ ची क्रेझ वाढली आहे. काही इच्छुकांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला,तर काहींनी स्वतंत्र उमेदवारीचा पर्याय निवडला आहे.सध्या राजकीय वातावरण तापले आहे.नगराध्यक्ष पदासाठी एकाच पक्षातून अनेक इच्छुक स्पर्धेत असल्याने बंडखोरीचे सावट दाटले आहे.नेत्यांना बंडखोरी थोपविण्यासाठी कसरत करावी लागत असून,काही पक्षांनी अंतिम उमेदवारी अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे.त्यामुळे अंतर्गत असंतोष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या बहुतेक पक्षांत उमेदवार ठरविण्याची घाई सुरू आहे.सध्या स्थितीत व्हॉट्सॲप ग्रुप,फेसबुक, इन्स्टाग्रामवरील पोस्ट आणि प्रभाग पातळीवरील भेटींचे कार्यक्रम हे उमेदवारांच्या प्रचाराची मुख्य साधने बनली आहेत. मतदारांशी थेट संवाद साधणे आणि वैयक्तिक नाते बांधणे हेच प्रचाराच्या रणनीतीचे मूळ ध्येय राहिले आहे.प्रत्येक प्रभागात संघर्षपूर्ण लढत अपेक्षित असल्याने उमेदवारांसाठी प्रत्येक मत महत्वाचे ठरणार आहे.यावेळेस बाजी कोण मारणार,हे निश्चित नसले तरीही काहीजण आम्हीच खरे नेते ठरणार आहोत; अशी अनेकांची मनधारणा झाल्याचे दिसून येते.
- Advertisement -

