Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्रीचे 'महामृत्युंजय वाड्.मय पुरस्कार-२०२५' जाहीर.. - जगभरातून साहित्यिकांचा सहभाग..

नाट्यश्रीचे ‘महामृत्युंजय वाड्.मय पुरस्कार-२०२५’ जाहीर.. – जगभरातून साहित्यिकांचा सहभाग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीने आयोजीत ‘महामृत्युंजय वाड्.मय स्पर्धा- २०२४-२५ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून स्पर्धा राज्यस्तरीय असली तरी जगभरातून साहित्यिकांनी सहभाग नोंदविला होता.त्यात परिक्षकांनी खालील विविध प्रकारच्या ३३ साहित्यांची निवड केली आहे.
कादंबरी विभाग-१)पंजाबची वाघीण-(अर्चना देव,बुलढाणा),२) काडीमोडातील काटे-(भ.पुं.कालवे, संभाजीनगर)३) वारी-(डॉ.वसुधा वैद्य,नागपूर)
कथासंग्रह विभाग-१) मिरॅकल-(डॉ.सुनील विभुते, बार्शी)२) झुरळ आणि इतर काही बाही (प्रमोदकुमार अणेराव,भंडारा)३) पठारावरचा दौलती-( प्रा.रसूल सोलापुरे,कोल्हापूर)
कवितासंग्रह विभाग-१)सिझर न झालेल्या कविता – (प्रा.डॉ.सुनील श्रीराम पवार,मेहकर),२) माडिया पिल्लो- (डॉ.यादवराव गावळे,बऱ्हाणपूर,म.प्र.)३) रुजता हलकेच- (सौ.स्मिता जडे,दामाजीनगर)
गझलसंग्रह विभाग-१)दीवान-ए-सिराज-(सिराज करीम शिकलगार,पलूस,जि.सांगली)२)मी शब्दांना मशाल करतो-दिलीप सीताराम पाटील,राजूरा  समीक्षाग्रंथ-१)पंडित-काव्य-रसास्वाद(त्रिदल) – (रमेश पोफळी,पुणे) २) नामदेव ढसाळ यांची कविता: आस्वाद आणि चिकित्सा-(डॉ.विनोद राऊत,बोरगाव मेघे)३) ‘बुढाई’ एक अभ्यास-डॉ.माधव कांडणगिरे, घुग्गुस (जि.चंद्रपूर)
संपादन/संशोधन-१)वसुंधरेचे शोधयात्री-(डॉ. अनुराग श्रीकांत लव्हेकर,बंगलोर)२)अंतराळवेध – (राजीव गजानन पुजारी,सांगली,३)मराठी तेलुगू भाषिक अनुबंध- (डॉ.दत्ताराम राठोड,अमरावती)
नाटक-१)नाते आपुले-(डॉ.विजयकुमार देशमुख, गोरेगाव (पू),२)परिवर्तन-(राजरत्न पेटकर,(वरोरा)
आत्मचरित्र- १)वन वे टिकीट टू यु.के.- (डॉ. राजश्री शिरभाते,इंग्लंड (यु.के.)’ २)जागरण – भारत सातपुते, (लातूर) ३)दौशाड-डॉ.नंदकुमार राऊत (पनवेल) चरित्रग्रंथ-१)कीर्तनसम्राट बाबामहाराज सातारकर- (सुनील पांडे,नीरा (पुणे)२)ज्ञानसूर्य म्हाइंभट-अनिल शेवाळकर,हिंगोली)
ललीतलेख-१) कोलाज-मुग्धा शेखर बोरकर(फोंडा – गोवा) २)वारी जनातली,जनांच्या मनातली- (डॉ. नरेंद्र भिकाजी कदम,खारघर (नवी मुंबई)
वैचारिक लेखसंग्रह-१)चोरांची लोकशाही-अनिल शां.पाटील(अलिबाग,जि.रायगड २)स्वातंत्र्याची ७५ वर्षे- (सत्यवान मंडलिक,वाळवा (सांगली)
बाल/कुमार साहित्य-१)गोष्टींतून विज्ञान सुगंध – (डॉ.मानसी मंगेश कोलते व डॉ.संजय जानराव ढोबळे, नागपूर),२) थेंबा थेंबाची कहाणी-(गणेश भाकरे, सावनेर)
आत्मकथन-१)पोलीस मन-(अजित देशमुख, सानपाडा,नवी मुंबई)२)क्षण.. सोनेरी,रुपेरी आणि काटेरी-(आनंद इंदिरा श्रीधर सांडू,चेंबूर,मुंबई)३) स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया आणि ‘मी’ अर्थात मृत्युंजय – (सुनील देसाई,भुदरगड(जि.कोल्हापूर)इत्यादी पुरस्कार जाहीर करण्यात आले असून येत्या ७ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक  गडचिरोलीच्या सभागृहात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात या साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे साहित्यिक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!