Thursday, June 25, 2026
Homeगडचिरोलीनागपूर ते गडचिरोली हेलिकॉप्टर प्रवासात अजित पवार सह देवेंद्र फडणवीस सुदैवाने बचावले…

नागपूर ते गडचिरोली हेलिकॉप्टर प्रवासात अजित पवार सह देवेंद्र फडणवीस सुदैवाने बचावले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रा.लि.या आयरन स्पोंज उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन सोहळा आज,१७ जुलैला  पार पडला.या सोहळ्यासाठी अजित पवार देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केला.

अजित पवारांनी आपल्या भाषणावेळी गडचिरोलीकडे येताना हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर काय घडले,याचा प्रसंगच सांगितला.अजित पवार म्हणाले की,तुम्हाला कल्पना नाही,भविष्यात किती मोठे बदल या भागात होतील.जेव्हा आम्ही येत होतो,खूप ढग होते.नागपुरातून उड्डाण केले तेव्हा बरे वाटत होते; मात्र गडचिरोलीजवळ आलो,हेलिकॉप्टर ढगात शिरले, तेव्हा माझ्या पोटात गोळा आला.मी इकडे तिकडे पाहत होतो.सर्व घाबरून होतो,मात्र देवेंद्र फडणवीस निवांत होते.त्यांना म्हणालो पहा आपण ढगात जात आहोत.तेव्हा फडणवीस म्हणाले घाबरु नका माझे आजवर सहा अपघात झालेले आहेत.मला मात्र कधीही काही झाले नाही.मी हेलिकॉप्टरला असलो तर कधी ही काही होत नाही आणि तसेच झाले आम्ही सुखरूप लँड झालो,असा किस्सा अजित पवारांनी सांगितला.त्यावेळी,उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर,त्यांच्या पूर्वजांची पुण्याई आहे ही असेही अजित पवारांनी म्हटले.

गडचिरोली मागास दुर्गम भाग असला तरी निसर्गाने या भागाला भरभरुन दिले आहे.सुरजागड येथील खाणीत हजारो कोटी रुपयांचा लोह खनिज आहे.आधी लॉयड्स मेटल्सने काम सुरू केले आता सुरजागड इस्पात या कंपनीने कारखाना सुरु केला आहे.धर्मराव बाबा आत्राम यांचे खास कौतुक करतो,त्यांनी आपली वडिलोपार्जित दीडशे एकर जमीन या कारखान्यासाठी दिली आहे.तर,उर्वरित जागा कंपनीने खरेदी केल्याची माहितीही त्यांनी दिली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!