उद्रेक न्युज वृत्त :- लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये काही जागांवर अतिशय धक्कादायक निकाल समोर आले आहेत. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला आहे.अनेकांचे नशीब केव्हा फळफळतील हे सांगता येत नाही.असाच प्रकार लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसून आला आहे.दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले दोन उमेदवार निवडणुकीत विजयी झालेले आहेत.त्यामुळे असामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे आता त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता येईल का? ते संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहू शकतील का? असा प्रश्न अनेकांना पडतो आहे. कायद्यानुसार त्यांना नवीन सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी नसली तरी त्यांना खासदार म्हणून शपथ घेण्याचा घटनात्मक अधिकार आहे.खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग यांनी पंजाबच्या खदूर साहिब जागेवर विजय मिळवला आहे.तर दहशतवादासाठी निधी पुरवल्याचा आरोप असलेला अब्दुल रशीद शेख विजयी झाले आहेत.अब्दुल रशीद शेख दहशतवादाला आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली ९ ऑगस्ट २०१९ पासून तिहार तुरुंगात आहेत. अमृतपाल सिंगला एप्रिल २०२३ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्यांना आसाममधील दिब्रुगड तुरुंगात पाठवण्यात आले होते.आता प्रश्न असा पडतोय की,तुरुंगा असलेल्या या निवडून आलेल्या खासदारांना शपथ घेता येणार का?
लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर तुरुंगात असलेल्या खासदारांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची प्रक्रिया काय असते? असा प्रश्न सर्वांना पडत आहे.कायदेशीररित्या,अमृतपाल सिंग आणि अब्दुल रशीद शेख यांना १८ व्या लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहण्यास मनाई आहे; तरीही त्यांना संसद सदस्य म्हणून शपथ घेण्याचा घटनात्मक अधिकार कायम आहे; असे पीटीआयच्या म्हणजेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले असल्याची माहिती इंडिया टाईम्सच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

