Tuesday, June 23, 2026
Homeमूलनमुना ८ सादर केला एका जागेचा अन् बांधकाम मात्र भलत्याच जागेवर..-ग्रामपंचायत सदस्याचा...

नमुना ८ सादर केला एका जागेचा अन् बांधकाम मात्र भलत्याच जागेवर..-ग्रामपंचायत सदस्याचा कारनामा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मूल(चंद्रपूर) :- मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या केळझर ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याने पतीच्या नावे मंजूर असलेल्या घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात एका जागेचे नमुना ८ सादर केले आणि बांधकाम मात्र भलत्याच जागेवर करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

महिला सदस्याने सदस्य पदाचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल केली आहे.त्यामुळे चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी; अशी मागणी सोहील मानकर यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.त्यामुळे घरकुल विभागात एकच खळबळ माजली आहे.

यशवंतराव चव्हाण विमुक्त जाती व भटक्या जमाती घरकुल योजनेअंतर्गत दिलीप श्रावण मराठे यांना सन २०२३-२४ मध्ये घरकुल मंजूर झाले.घरकुलाच्या बांधकामासाठी त्यांच्या मालकी हक्काचे ग्रामपंचायत नमुना ८ ला मालमत्ता क्रमांक- ७७८ क्रमांकाचे नमुना ८ पंचायत समितीच्या घरकुल विभागात सादर केले. शासनाच्या नियमानुसार ज्या जागेचे कागदपत्र सादर केले,त्याच जागेवर घरकुलाचे बांधकाम करणे गरजेचे होते.मात्र,त्यांच्या पत्नी वैशाली दिलीप मराठे या ग्रामपंचायत सदस्य असल्याने आमचे कोण काय बिघडवणार? या आविर्भावात पतीच्या नावे असलेल्या जागेवर घरकुलाचे बांधकाम न करता शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधकाम करीत आहेत. वैशाली मराठे यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा दुरूपयोग करून शासनाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून त्यांना सदस्य पदावरून अपात्र करण्यात यावे; अशी मागणी सोहील मानकर यांनी निवेदनातून केली आहे.प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही न केल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे.

घरकुल मंजूर झाल्यावर बांधकाम करण्यासाठी कार्यालयात सादर केलेल्या नमुना ८ वर संबंधित गृहनिर्माण अभियंत्यांनी बांधकामाचे लेआऊट देणे गरजेचे असते.मात्र गृहनिर्माण अभियंते कार्यालयातच बसून कारभार हाकतात.लाभार्थी आपल्या मर्जीने लेआऊट देऊन बांधकाम करीत असल्याने असे प्रकार घडत आहेत.त्यामुळे गृहनिर्माण अभियंत्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!