Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवाद्यांचा घातपाताचा कट; प्रेशर बॉम्बचा एकामागून एक स्फोट.. -११ जवान गंभीर जखमी..

नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट; प्रेशर बॉम्बचा एकामागून एक स्फोट.. -११ जवान गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-काही काळासाठी अंडर ग्राउंड झालेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे
चित्र छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात उघडकीस आले आहे.नक्षलवाद्यांनी घातपातासाठी जंगल परिसरात पेरून ठेवलेल्या प्रेशर बॉम्बचा एकामागून एक स्फोट झाल्याने नक्षलविरोधी कारवाईवर असलेले ११ जवान गंभीर जखमी झाल्याची घटना काल रविवारी बिजापूर जिल्ह्याच्या करेगट्टा टेकड्यांवरील घनदाट जंगल परिसरात घडली असून याबाबत आज,सोमवार २६ जानेवारी रोजी माहिती जाहीर करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाचे जवान करेगट्टा टेकड्यांवरील घनदाट जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना जमिनीखाली असलेले प्रेशर बॉम्ब एकामागून एक स्फोट होत राहिले. ज्यामुळे सैनिक गंभीर जखमी झाले.जखमी सैनिकांपैकी १० जण राज्य पोलिसांच्या जिल्हा राखीव रक्षक(DRG) पथकाचे आहेत,तर एकजण केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या(CRPF)कोब्रा बटालियनमधील आहे.रुद्रेश सिंह असे कोब्रा बटालियनच्या जखमी सैनिकाचे नाव असून ते कोब्राच्या २१० व्या बटालियनमध्ये उपनिरिक्षक म्हणून तैनात होते.पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती देतांना सांगितले की,उपनिरीक्षक रुद्रेश सिंह आणि दोन डीआरजी सैनिकांच्या पायांना दुखापत झाली आहे.इतर तीन सैनिकांच्या डोळ्यात बारुद गेला,तर इतर सैनिकांनाही दुखापत झाली आहे.सर्व जखमींना पुढील उपचारासाठी रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सद्या काहींची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!